पाकमध्ये आघाडीचे सरकार ; इम्रान खान यांच्या पक्षाला 117 जागा

पीटीआय
शनिवार, 28 जुलै 2018

माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग - नवाज (पीएमएल-एन) पक्षाची निवडणुकीत पीछेहाट झाली असून, त्यांना अवघ्या 62 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) वाट्याला 43 जागा आल्या आहेत. निवडणूक आयोगाने शुक्रवारी 261 जागांचे निकाल जाहीर केले. 

इस्लामाबाद : माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिके इन्साफ पक्ष (पीटीआय) 270 पैकी 114 जागा जिंकत पाकिस्तानातील संसदीय निवडणुकीमध्ये सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे खान हे पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान होणार असल्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी सत्तास्थापनेसाठी त्यांना अपक्ष आणि छोट्या पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागणार असल्याचे चित्र आहे. 

माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग - नवाज (पीएमएल-एन) पक्षाची निवडणुकीत पीछेहाट झाली असून, त्यांना अवघ्या 62 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) वाट्याला 43 जागा आल्या आहेत. निवडणूक आयोगाने शुक्रवारी 261 जागांचे निकाल जाहीर केले. 

सत्तास्थापनेसाठी 172 जागांची आवश्‍यकता असल्यामुळे खान यांच्या पक्षाला विजयी झालेले अपक्ष उमेदवार आणि छोट्या पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हालचालींना सुरवात झाली असून, काही अपक्ष आणि छोट्या पक्षांशी पीटीआयकडून संपर्क साधण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेच्या एकूण 342 जागांपैकी 272 जागांसाठी थेट मतदान घेतले जाते. 270 जागांवर मतदान झाले असून, त्यापैकी 261 जागांचे निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. 
 
Web Title: Alliance Government in Pakistan 117 seats for Imran Khans party