Amazon कंपनीचा मोठा निर्णय, ६०० चिनी ब्रॅन्ड्सवर बंदी

अॅमेझॉन कंपनीने चीनच्या ६०० कंपन्यांवर बंदी घातल्यानंतर स्पष्टीकरण दिले आहे.
Amazon
AmazonFile Photo

अॅमेझॉन या इ-क़ॉमर्स कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. 'द व्हर्ज'च्या अहवालानुसार अॅमेझॉनने ६०० चिनी ब्रॅन्ड्सवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे कंपनीने सांगितले. अॅमेझॉनच्या रिव्ह्यु पॉलिसीमध्ये या कंपन्यांनी छेडछाड केली होती. या प्रकरणावर ह वॉल स्ट्रीट जर्नलने रिपोर्ट दिला आहे.

संबंधित कंपन्या प्रोडक्ट्सवर चांगला रिव्ह्यु देण्याच्या बदल्यात अॅमेझॉनचे गिफ्ट कार्ड्स देत असल्याचे उघडकीस आले. तसेच अनेक ठिकाणी फेक रिव्ह्यु देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. अशा प्रकारे बनावट रिव्ह्यु देऊन ग्राहकांची फसवणूक होत असल्याने या कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अॅमेझॉनने दिली.

Amazon
टागोरांंच्या लंडनमधील घराची होणार विक्री; ममता बॅनर्जी खरेदीच्या तयारीत

मात्र, हा निर्णय चीनला लक्ष्य करण्यासाठी घेतला नसून ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी घेतल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. गैरवर्तन आणि ग्राहकाविरोधी कृत्यांना आमचे समर्थन नसून धोरणांचे उल्लंघन करणाऱ्यांवर निलंबन, बंदी आणि कायदेशीर कारवाई करतो, असे अॅमेझॉनने सांगितले.

बंदी घातलेल्या ब्रॅन्ड्समध्ये औकी एमपॉ, वावा, रॉपॉवर या मोठ्या ब्रॅन्ड्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अन्य काही मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. या बंदीनंतर अनेक चिनी कंपन्यांनी ईबे आणि अली एक्सप्रेस यांसारख्या इतर ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

Amazon
CIA अधिकारी 'हॅवाना सिंड्रोम'ग्रस्त, भारतात लागण?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com