Viral: अधिकारी तर्राट झाला, दुसऱ्याच महिलेच्या बेडवर झोपला!

Viral
Viralesakal

नवी दिल्लीः एका मोठ्या कंपनीचा मोठा अधिकारी तर्रर्र..नशेत दुसऱ्याच एका अनोळखी महिलेच्या घरात घुसून तिच्या बेडवर झोपल्याची घटना घडली आहे. पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्याला साधं बोलताही येत नव्हतं.

त्याचं झालं असं, एका मीट प्रोसेसिंग कंपनीमध्ये चिफ फायनान्शिअल ऑफिसर असलेल्या नशेखोराला पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं. अनधिकृतपणे तो एका महिलेच्या घरात घुसला. तिच्या बेडवर झोपला. जेव्हा ही महिला घरी आली तेव्हा चक्रावून गेली. तिने तातडीने पोलिसांना फोन केला. अमेरिकेमध्ये ही घटना घडली आहे.

फाएट्टेविले पोलिसांना यासंबंधी फोन आल्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. त्यांनी ३२ वर्षीय टायसनला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे महाशय काहीही बोलण्याच्या मनःस्थिती नव्हते. पोलिसांना तो दारु पिल्याचं लक्षात आलं. तरीही पोलिस त्याला तेथून घेऊन गेले. विशेष म्हणजे त्यांने त्याचे कपडेदेखील काढून खाली टाकले होते. टायसनला आता १ डिसेंबर रोजी कोर्टात हजर व्हावं लागणार आहे.

या प्रकारानंतर टायसनने माफी मागितली आहे. आपल्या नशेखोरीवर काऊन्सलिंग सुरु असल्याचं त्याने सांगितलं. शिवाय आपण या प्रकारामुळे दिलगिर असल्याचंही कंपनीला सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com