अमेरिकेत बर्थडे पार्टीत गोळीबार; 7 जणांचा मृत्यू

आरोपी हा हल्ल्यात ठार झालेल्या एका महिलेचा बॉयफ्रेंड होता. त्याने वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचताच बेछूट गोळीबार सुरु केला.
अमेरिकेत बर्थडे पार्टीत गोळीबार; 7 जणांचा मृत्यू
Summary

आरोपी हा हल्ल्यात ठार झालेल्या एका महिलेचा बॉयफ्रेंड होता. त्याने वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचताच बेछूट गोळीबार सुरु केला.

न्यूयॉर्क - अमेरिकेत (America) पुन्हा एकदा गोळीबाराची (Shooting) घटना घडली आहे. एका बारमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत (birthday party) गोळीबार झाला. कोलरॅडोतील (Colorado) पार्टीमध्ये एकाने हा हल्ला केला आहे. गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोराने सहा जणांना गोळी घालून ठार केले. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेतली. या हल्ल्यामागचा उद्देश अद्याप समोर आलेला नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा हल्ल्यात ठार झालेल्या एका महिलेचा बॉयफ्रेंड होता. त्याने वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचताच बेछूट गोळीबार सुरु केला. 6 जणांचा मृत्यू पार्टी सुरु असलेल्या हॉलमध्येच झाला. तर एकाची प्रकृती गंभीर होती. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला.

अलिकडच्या काही महिन्यात अमेरिकेत गोळीबाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यावर्षी 22 मार्चला कोलरॅडोत अशीच एक घटना घडली होती. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला होता. याआधी अमेरिकेच्या फिनिक्स हॉटेलमध्ये गोळीबार झाला होता. त्यात एकाचा मृत्यू तर सात जण जखमी झाले होते. अधिकाऱ्यांना रात्री साडेबाराच्या सुमारास हयात रिजन्स फिनिक्स हॉटेलमध्ये गोळीबारीची माहिती मिळाली. पोलिसांनी सांगितलं की, हॉटेलमध्ये कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये वाद झाला. त्यातूनच गोळीबाराला सुरुवात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com