चीनला दणका देण्यासाठी अमेरिकेची नवी रणनिती, हजारो विद्यार्थांना बसणार फटका

टीम ई-सकाळ
शनिवार, 30 मे 2020

अमेरिका चीनला कोंडींत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्यात आता आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेकडून  हाँगकाँगला देण्यात आलेले विशेष अधिकार काढून घेण्यात येणार असल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.

वाशिंग्टन : कोरोना विषाणूने जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातही उलथापालथ होताना दिसत आहे. अमेरिका-चीन यांच्यातील संबंध कमालीचे ताणले जात आहेत. एका बाजूला कोरोना विषाणूमुळे डोकेदुखी वाढत असताना दुसऱ्या बाजूला या महा साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावाला जबाबदार धरत अमेरिकेने सुरुवातीच्या काळापासून चीनवर आरोप प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळत आहेत. याशिवाय अन्य मुद्यावरुनही अमेरिका चीनला कोंडींत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्यात आता आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेकडून  हाँगकाँगला देण्यात आलेले विशेष अधिकार काढून घेण्यात येणार असल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. अमेरिकेतील विद्यापीठात चीनी विद्यार्थांवर निर्बंध घालण्याचे संकेत अमेरिकेकडून देण्यात आले आहेत.   

या राज्याने घातली तब्बल पाच राज्यातील लोकांना बंदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून पूर्व ब्रिटिश कॉलनीसंदर्भातील विशेष अधिकाराच्या कायद्यावरुन चीनवर निशाणा साधला आहे. ट्रम्प म्हणाले की, बिजिंग शहरातील पारंपारिक आणि अभिमानाची गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न चीनकडून सुरु आहे. चीनने घेतलेला निर्णय हा हाँगकाँग, चीन आणि इतर राष्ट्रांसाठी त्रासदायक ठरेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या गटातून अमेरिका वेगळे होणार असल्याचेही ट्रम्प यांनी यावेळी स्पष्ट केले. जागतिक आरोग्य संघटना कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटजन्य परिस्थितीला कारणीभूत असलेल्या चीनची पाठराखण करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. 

'लॉकडाउन-5' चा निर्णय कोणाच्या कोर्टात?

अमेरिकेन युनिवर्सिटीमध्ये पदवी तसेच शोध प्रबंध शिक्षण घेणाऱ्या चीनी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची योजना अमेरिकन प्रशासनाकडून केली जात आहे. चीनने हाँगकाँगमध्ये नवा राष्ट्रीय कायदा लागू केल्यामुळे अमेरिकेने संताप व्यक्त करत चीनविरोधात नवी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांपैकी हजारो विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या या भूमिकेचा फटका बसू शकतो. चीनी विद्यार्थ्यांबाबत नवी भूमिका घेऊन चीनची कोंडी करण्याबाबत अद्याप अधिकृत आदेश जारी करण्यात आलेले नाहीत. मात्र लवकरच अमेरिका या निर्णयाने चीनला दणका देण्याची शक्यता आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america chinese grad students may be next hit by us china tensions