ट्रम्प-बायडेन यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस! कौल वेटिंगवर

वृत्तसंस्था
Thursday, 5 November 2020

अनेक वादांनी भरलेल्या, आरोप-प्रत्यारोपांनी रंगलेल्या, कोरोना काळातही विक्रमी मतदान झालेल्या, मतांचे ध्रुवीकरण झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अनिश्‍चितता अद्यापही संपलेली नाही. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली असून मतमोजणी पूर्ण न झाल्याने विजयाचा अंदाज स्पष्टपणे आलेला नाही. त्यामुळे अमेरिकेचा अध्यक्ष कोण असेल, ही उत्सुकता ताणली गेली आहे.

वॉशिंग्टन - अनेक वादांनी भरलेल्या, आरोप-प्रत्यारोपांनी रंगलेल्या, कोरोना काळातही विक्रमी मतदान झालेल्या, मतांचे ध्रुवीकरण झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अनिश्‍चितता अद्यापही संपलेली नाही. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली असून मतमोजणी पूर्ण न झाल्याने विजयाचा अंदाज स्पष्टपणे आलेला नाही. त्यामुळे अमेरिकेचा अध्यक्ष कोण असेल, ही उत्सुकता ताणली गेली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अखेरीस हाती आलेल्या वृत्तानुसार, एकूण मते आणि इलेक्टोरल मते (ज्यांना मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले) यात ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यापेक्षा थोडी आघाडी घेतली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सास, फ्लोरिडा, ओहियो या प्रमुख राज्यांमध्ये विजय मिळविल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे तर बायडेन यांनी कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, ॲरिझोना आणि इलिनॉइस ही राज्ये खिशात घातल्याचे चित्र आहे. आतापर्यंत ५० राज्यांपैकी ४१ राज्यांमध्ये प्राथमिक निकाल जाहीर झाले आहेत.

चीनची कोविड-19 लस यूएईच्या पंतप्रधानांनी घेतली टोचून

सध्याच्या चित्रानुसार, बायडेन यांनी २३८ इलेक्टोरल मते मिळविली आहेत, तर ट्रम्प यांच्याकडे २१३ इलेक्टोरल मते आहेत. एकूण ५३८ इलेक्टोरल मतांपैकी २७० मते मिळविणारा उमेदवार अमेरिकेचा अध्यक्ष होईल. एकूण मतांमध्येही बायडेन यांना आतापर्यंत ६,९०,२९,६५९ मते मिळाली असून ट्रम्प यांना ६,६७,४५,९९७ मते मिळाली आहेत. अर्थात, ही प्राथमिक मोजणी असून टपालाद्वारे झालेले प्रचंड मतदान अद्याप जमेस धरलेले नाही. त्यामुळे निकालात बदलही होऊ शकतो. तसेच, मिशीगन, विस्कॉन्सिन आणि पेनसिल्वानिया या मोठ्या राज्यांमधील प्राथमिक निकालही अद्याप बाहेर आलेला नाही. यंदाच्या निवडणुकीत १६ कोटींहून अधिक जणांनी मतदान केल्याचा अंदाज आहे. अधिकृत निकाल १० तारखेनंतर जाहीर होण्यास सुरवात होणार आहे. 

अमेरिकेचा अध्यक्ष कोण होणार, याची जगभरातील देशांमध्ये उत्सुकता आहे. यंदा बदल होईल, असा अनेकांचा अंदाज आहे. ट्रम्प यांनी विजयाचा दावा केला असला तरी बायडेन यांच्याकडे प्राथमिक कल झुकत आहे. नेवादा आणि विस्कॉन्सिन या राज्यांत बायडेन हे आघाडीवर असून येथे विजय मिळाल्यास ‘व्हाइट हाऊस’चा मार्ग त्यांच्यासाठी अधिक प्रशस्त होऊ शकतो. शिवाय, टपालांद्वारे आलेल्या मतांचाही त्यांना आधार मिळू शकतो. ट्रम्प यांनी मात्र मतदान थांबविण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांना पेनसिल्वानियामध्ये विजय मिळाल्यास पुन्हा अध्यक्ष होण्याची त्यांना संधी मिळू शकते. 

येथील निकाल बाकी
अलास्का, ॲरिझोना, जॉर्जिया, मिशीगन, माइने, नेवादा, उत्तर कॅरोलिना, पेनसिल्वानिया, विस्कॉन्सिन

US Presidential Election: निकाल हाती येण्यासाठी लागू शकतात आणखी काही दिवस

सिनेटसाठीही मतदान 
अध्यक्षपदाबरोबरच अमेरिकेत सिनेट आणि लोकप्रतिनिधीगृहासाठीही (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह) मतदान झाले. सिनेटमध्ये १०० सदस्य असतात तर लोक प्रतिनिधीगृहात ४३५ सदस्य असतात. या दोन्ही सभागृहांत आपल्या पक्षाचे वर्चस्व असले तरच अध्यक्षांना पूर्ण क्षमतेने आपल्या अधिकारांचा वापर करता येतो. या दोन्ही सभागृहांसाठीही तुल्यबळ लढत होत आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: America Election Politics Result on Waiting