Russia Ukraine War : अमेरिकेची कठोर भूमिका; म्हणालं, इराणनं रशियाला शस्त्रं पाठवणं बंद करावं, अन्यथा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russia Ukraine War Updates

दर दिवसागणिक रशिया-युक्रेन युद्ध स्फोटक वळण घेताना दिसत आहे.

Russia Ukraine War : अमेरिकेची कठोर भूमिका; म्हणालं, इराणनं रशियाला शस्त्रं पाठवणं बंद करावं, अन्यथा..

वॉशिंग्टन : दर दिवसागणिक रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) स्फोटक वळण घेताना दिसत आहे. जिथं युद्ध आतातरी संपेल अशी अपेक्षा केली जात असताना पुन्हा एकदा युद्धानं हिंसक वळण घेतलं आहे. रशियाकडून सातत्यानं युक्रेनवर क्षेपणास्त्र डागण्यास सुरुवात केली आहे.

अशा परिस्थितीत आता अमेरिकेनं (America) इराणला (Iran) रशियाला शस्त्रं पाठवणं थांबवण्यास सांगितलंय. व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत कॅरिन जीन-पियरे (Karine Jean Pierre) यांनी सांगितलं की, आम्हाला आता चिंता वाटू लागलीय. रशियानं लोकांना मारणं थांबवावं आणि युक्रेनियन लोकांना मारण्यासाठी रशियाला शस्त्रं पाठवणं इराणनं थांबवावं, असा सल्ला अमेरिकेनं दिला आहे.

हेही वाचा: VIDEO : छठ घाटांच्या पाहणीदरम्यान नितीशकुमार जखमी; पायाला-पोटाला गंभीर दुखापत, स्वत: सांगितला सगळा प्रकार

युद्ध दिवसेंदिवस हिंसक होत आहे. यामुळं यूएस प्रशासन अत्यंत चिंतेत आहे. युक्रेनवरील आक्रमणात इराण सशस्त्र ड्रोन पुरवत असल्याचा आरोप आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी बुधवारी सांगितलं की, रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यासाठी आतापर्यंत जवळपास 400 इराणी ड्रोनचा वापर केला आहे.

रशिया आणि इराण संपूर्ण जगापासून वेगळे होत आहेत. त्यामुळं दोन्ही देशांमधील जवळीक वाढत आहे. युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारण्यात इराण रशियाला मदत करत असल्याचं यावरून स्पष्ट झालं आहे. यामुळं आता इराणनं आपल्या लोकांची हत्या करणं थांबवावं, तसंच रशियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवावा, असा सल्ला अमेरिकेनं इराणला दिलाय. आता इराण प्रशासन याबाबत कोणता निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा: Telangana : भाजपकडून टीआरएसच्या 4 आमदारांना 100 कोटींची ऑफर; तिघांना 15 कोटींसह पोलिसांनी घेतलं ताब्यात