मास्क व्यवस्थित घालण्यास सांगितल्यावर तोंडावर थुंकला अन्...

या व्यक्तीला मास्क न घालण्याचं प्रकरण भोवलं
no face mask
no face mask

कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव टाळायचा असेल तर मास्क (mask) घालण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मास्क घालणं, हात सॅनिटाइज करणं आणि सोशल डिस्टंसिंग ठेवणं या तीन गोष्टींची काळजी घेण्याचं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील अनेक जण या सगळ्याकडे दुर्लक्ष करतांना दिसतात. खासकरुन अनेक जण मास्क घालण्यास टाळाटाळ करतात. विशेष म्हणजे या मास्क वापरावरुन अमेरिकेत दोन जणांचा वाद झाला असून हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचलं आहे. इतकंच नाही तर दोषी व्यक्तीला न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. (america-not-wearing-mask-properly-misbehaving-10-years-imprisonment)

अमेरिकेत एका व्यक्तीने मास्क व्यवस्थितरित्या न घातल्यामुळे अन्य एका व्यक्तीने त्याला मास्क नीट करण्यास सांगितला. याच राग आल्यामुळे संबंधित व्यक्ती सूचना करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर चक्क थुंकला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं.

no face mask
'सजीवसृष्टी नष्ट होण्यामागे एलियन ठरतील कारण'

शेन वेन मायकेल हा व्यक्ती एका चष्म्याच्या दुकानासमोर उभा होता. त्यावेळी त्याा मास्क चेहऱ्यावर नीट नसल्यामुळे मार्क डीनिंग या व्यक्तीने त्याला मास्क नीट घालण्यास सांगितला. या गोष्टीचा मायकेलला प्रचंड राग आला आणि त्याने तो मास्क काढून जमिनीवर फेकला. इतकंच नाही तर, जर मला कोरोना झाला असेल तर तो तुला सुद्धा झालाच पाहिजे, असं म्हणत मायकेल मार्कच्या अंगावर थुंकला आणि हा शाब्दिक वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.

no face mask
आर्थिक चणचण जाणवतेय?; अशी करा पैशांची बचत

मार्क आणि मायकेलमधील वाद वाढत असल्यामुळे उपस्थित लोकांनी याविषयी पोलिस तक्रार केली. त्यानंतर मायकेलविरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान, गैरजबाबदार आणि चुकीचं वर्तन केल्याप्रकरणी मायकेलला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com