चॉकलेट फॅक्टरीत भीषण स्फोट; दोन ठार, 9 कामगार बेपत्ता I Chocolate Factory Explosion | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chocolate Factory Explosion

आता कोणताही धोका नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र, पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना कारखान्याकडं जाण्यापासून रोखलंय.

Chocolate Factory Explosion : चॉकलेट फॅक्टरीत भीषण स्फोट; दोन ठार, 9 कामगार बेपत्ता

अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया (USA Pennsylvania) प्रांतात असलेल्या चॉकलेट फॅक्टरीत शुक्रवारी स्फोट (Chocolate Factory Explosion) झाल्याचं वृत्त आहे.

या स्फोटात कारखान्यात काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातात नऊ जण बेपत्ता आहेत.

सध्या पोलीस स्फोटाचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. पेनसिल्व्हेनियाच्या वेस्ट रीडिंग पोलिस (West Reading Police Department) विभागाचे प्रमुख म्हणाले, वेस्ट रीडिंग परिसरातील आर.एम. पाल्मर कंपनीच्या प्लांटमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलं.

दुर्घटनेनंतर नऊ जण बेपत्ता आहेत. सायंकाळी 4.57 च्या सुमारास कारखान्यात स्फोट झाला. स्फोटामुळं इमारतीचा काही भाग कोसळला असून शेजारील इमारतीचंही नुकसान झालंय. स्फोटाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

आता कोणताही धोका नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र, पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना कारखान्याकडं जाण्यापासून रोखलंय. या अपघातात जखमी झालेल्या आठ जणांना शुक्रवारी सायंकाळी रीडिंग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून उर्वरितांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आलंय.

टॅग्स :americachocolate