एच-1बी व्हिसा लॉटरी पद्धतीनेच- अमेरिकन न्यायालय

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मार्च 2017

ओरेगॉन येथील एका संघराज्य न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, एच-1बी व्हिसा देण्याच्या प्रक्रियेत आगामी आर्थिक वर्षात कोणताही बदल होणार नाही. अमेरिकेचे आर्थिक वर्ष 3 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 

वॉशिंग्टन : एच-1बी व्हिसाचे अर्ज मंजूर करण्यासाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब करण्याला आव्हान देणारी याचिका अमेरिकन न्यायालयाने फेटाळून लावली. 

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कंपन्या आणि व्यावसायिकांची एच-1बी व्हिसासाठी अधिक मागणी असते. ओरेगॉन येथील एका संघराज्य न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, एच-1बी व्हिसा देण्याच्या प्रक्रियेत आगामी आर्थिक वर्षात कोणताही बदल होणार नाही. अमेरिकेचे आर्थिक वर्ष 3 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 

परिणामत: अमेरिकन नागरिकत्व आणि स्थलांतर सेवा विभागाच्या वतीने लॉटरी पद्धतीनेच व्हिसा अर्जदारांची निवड करण्यात येणार आहे. एच-1बी व्हिसासाठी अमेरिकेच्या या विभागाकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात. साधारण प्रवर्गात 65000 आणि परदेशी विद्यार्थ्यांसाठी 20000 एवढी संख्येची मर्यादा आहे. 

पोर्टलँड येथील दोन कंपन्यांनी लॉटरी पद्धतीवर आक्षेप घेणारा दावा दाखल केला होता. त्यावर 31 पानी निकालामध्ये जिल्हा न्यायाधीश मायकेल सायमन यांनी अमेरिकन खात्याचा निर्णय कायम ठेवला. 
 

Web Title: american court upheld lottery for H1-B visa