अमेरिकी मतदार "इसिस'च्या रडारवर 

पीटीआय
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवशी मतदारांचे "हत्याकांड' करण्याचे आवाहन "इसिस'ने केला असल्याचा दावा अमेरिकास्थित एका संस्थेने केला आहे. अमेरिकेतील मुस्लिमांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी न होण्याचा इशाराही "इसिस'ने दिला आहे. 

विविध दहशतवादी गटांच्या हालचालींकडे लक्ष ठेवणाऱ्या अमेरिकेमधील "साइट' या संस्थेचे संचालक रिट्‌झ काट्‌झ यांनी ही माहिती दिली आहे. "इसिस'च्या अल हयात या प्रसिद्धी केंद्राने हे आवाहन जारी केले असून "तुम्हाला मारून टाकण्यास आणि तुमच्या मतपेट्या फोडून टाकण्यास आम्ही आलो आहोत,' असे त्यांनी प्रसिद्ध केले आहे. "इसिस'ने सात पानी "जाहीरनामा' प्रसिद्ध करत दहशतवाद्यांना चिथावणी दिली आहे. या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी अमेरिकेतील रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांना मुस्लिमविरोधी घोषित करत त्यांच्यावर हल्ले करण्यास सांगितले आहे. अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेत बाधा आणणे आणि हिंसाचार घडवून जगाचे लक्ष वेधून घेणे, हे "इसिस'चे उद्दिष्ट असल्याचे काट्‌झ यांचा अंदाज आहे. 

या इशाऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. न्यूयॉर्क, व्हर्जिनिया आणि टेक्‍सास येथे हल्ले होण्याची अधिक शक्‍यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: American voters on the radar of the Isis