अमेरिकींसाठी १.९ ट्रिलियन डॉलरचे पॅकेज;नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांची घोषणा

अमेरिकींसाठी १.९ ट्रिलियन डॉलरचे पॅकेज;नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांची घोषणा

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी  नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन १.९ ट्रिलियन डॉलरचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांना थेट आर्थिक मदत देण्याचे सरकारचे नियोजन आहे. अमेरिकेतील स्थानिक उद्योगांना सावरण्याबरोबरच राष्ट्रीय पातळीवरील लसीकरणाच्या मोहिमेला बूस्टर डोस देण्याचे सरकारने ठरविले आहे. बायडेन यांनी गुरुवारीच या पॅकेजची घोषणा केली.

या पॅकेजमधील ४१ अब्ज डॉलरचा निधी हा कोरोनाच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी खर्च केला जाणार असून एक ट्रिलीयन डॉलर हे थेट आर्थिक मदतीच्या रूपाने देण्यात येतील. उद्योगांना ४४० अब्ज डॉलरचे आर्थिक साहाय्य केले जाणार आहे. अमेरिकी सरकारने बेरोजगार भत्त्यामध्येही वाढ केली असून तो आता  तीनशे डॉलरवरून चारशे डॉलर करण्यात आला आहे. या बेरोजगार भत्त्याच्या मोहिमेला  सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

बायडेन यांनी कोरोना लसीकरणावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. देशव्यापी लसीकरण मोहिमेसाठी २० अब्ज डॉलरची वेगळी रक्कम बाजूला ठेवण्यात आली असून चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी ५० अब्ज डॉलर खर्च केले जाणार आहेत. आम्हाला आताच थेट कृती करावी लागेल. अर्थशास्त्रज्ञ देखील तेच सांगत आहेत. अमेरिकी नागरिकांनी उराशी बाळगलेली मूल्ये देखील तेच सांगू पाहत आहेत. 

अशी असेल व्यवस्था
  बहुस्तरिय सुरक्षा कवच
  कॅपिटॉल इमारतीच्या आजूबाजूला कुंपण व अडथळे उभारणार.
  राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे दहा हजारापेक्षा जास्त सैनिक तैनात.
  शपथविधीला उपस्थितांची संख्या मर्यादित असेल.
  संचलनासह बहुतेक कार्यक्रम व्हर्च्युअल होणार.
  फादर लिओ जे. ओडोनोव्हन हे प्रार्थना करणार आहे.
  एकनिष्ठतेच्या प्रमाणपत्राचे वाचन अग्निशमन दलाचे कर्मचारी अँद्रेया हॉल करणार आहेत.

लेडी गागा यांचे सादरीकरण होणार
अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा शपथविधी येत्या २० रोजी होणार आहे. कडक सुरक्षेत होणाऱ्या या शानदार कार्यक्रमात पॉप गायक जेनिफर लोपेझ आणि लेडी गागा यांचे सादरीकरण होणार आहे. 
‘यूएस कॅपिटॉल’मधील वेस्ट फ्रंट येथे शपथविधी समारंभ होणार असून लेडी गागा ही अमेरिकेचे राष्ट्रगीत म्हणणार असून लोपेझ संगीतमय कार्यक्रम सादर करणार आहे. जस्टिन टिंबरलेक, जॉन बोन जिवो, डेमी लोवेटो आणि अँट क्लेमोंस हे कलाकारही त्यांची कला सादर करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बायडेन (वय ७८) हे अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष असतील. ते व नवनियुक्त उपाध्यक्षा कमला हॅरिस (वय ५६) हे यावेळी शपथ घेतील.  कोरोनामुळे नेहमीच्या शपथविधी समारंभाप्रमाणे हा कार्यक्रम होणार नाही. अध्यक्ष ट्रम्प हे हा कार्यक्रम टाळण्याची शक्यता आहे. तसे झाले तर नव्या अध्यक्षाकडे सूत्रे सोपविण्यासाठी विद्यमान अध्यक्ष गैरहजर असल्याची घटना १८६९ नंतर प्रथमच नोंदविली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com