पाकिस्तानमध्ये आणखी एका हिंदू मुलीचे अपहरण

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 मार्च 2019

पत्रकार बिलाल फारुकी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'सोनिया भिल या हिंदू मुलीचे सिंध प्रांतातून अपहरण करण्यात आले आहे. ही घटना तेव्हा घडली आहे जेव्हा पाकिस्तानात दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करण्याचा घटना सर्व माध्यमांमध्ये चर्चेत आहे.

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करुन जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकण्याची घटना ताजी असतानाच आणखी एका हिंदू मुलीचे अपहरण झाले आहे. या हिंदू मुलीचे अपहरण करुन धर्म परिवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील ज्येष्ठ पत्रकार बिलाल फारुकी यांनी ट्विट करुन हे प्रकरण उघडकीस आणले आहे.

पत्रकार बिलाल फारुकी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'सोनिया भिल या हिंदू मुलीचे सिंध प्रांतातून अपहरण करण्यात आले आहे. ही घटना तेव्हा घडली आहे जेव्हा पाकिस्तानात दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करण्याचा घटना सर्व माध्यमांमध्ये चर्चेत आहे. इम्रान खान सरकार अल्पसंख्यांकांना सुरक्षा देण्यास अपयशी ठरलेय का? असा प्रश्न बिलाल फारुकी यांनी विचारला आहे.'

पाकिस्तानातील सिंध प्रांतात दोन अल्पवयीन हिंदू मुलींना पळवून व त्यांचे धर्मांतर करून त्यांची बळजबरीने लग्ने केल्याप्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकच्या भारतीय दूतावासाला चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश दिले. शिवाय, या मुलींना लवकरात लवकर सोडवून त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करा, अशी मागणी सुषमा स्वराज यांनी केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन त्याबाबत तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. ज्या फवाद चौधरी नामक मंत्र्यांनी स्वराज यांचा प्रतिवाद केला होता त्यांनाच ही माहिती जाहीर करावी लागली. शिवाय, सात जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, इस्लामाबाद उच्च न्यायालयानेही इम्रान सरकारला हिंदू मुलीच्या अपहरणावरुन फटकारले असून, या दोन मुलींना सुरक्षा देण्याचे दिले आहेत. या प्रकरणी 7 आरोपींना अटक केल्याची माहिती सरकारने न्यायालयात दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: another hindu girl kidnapped in pakistan