माया संस्कृतीतील चित्रलिपीचे पदक सापडले.. 

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

सॅन डियेगो - अमेरिकेतील दक्षिण बेलीझ येथे पुरातत्व खात्याच्या संशोधकांना माया संस्कृतीमधील राजाचे काही दागिने सापले आहेत. या दागिन्यांमध्ये सापडलेल्या एका पदकावर माया संस्कृतीमधील चित्रलिपी असून, मायन राजा हे पदक समारंभाच्या वेळी परिधान करण्यासाठी वापरत असावा, असे संशोधकांचे मत आहे.

कॅलिफोर्निया विद्यापिठाने दिेलेल्या माहितीनुसार, उत्खननच्या ठिकाणी मायन राजाचा राजवाडा असवा, तसेच त्याचे थडगेही तेथेच असावे असा अंदाज आहे.

2015 मध्ये याच ठिकाणी केलेल्या उत्खननात संशोधकांना काही दात, मातीची भांडी सापडली होती. हे अवशेष सूमारे 800 वर्षांपूर्वीचे असावेत असा अंदाज संशोधकांनी वर्तविला आहे. 

माया संस्कृतीविषयी काही रंजक गोष्टी..

  • माया संस्कृती अमेरिकेत विकसीत झाली. आज मेक्सिकोत हे स्थान आहे.
  • माया एक मेसोअमेरिकन संस्कृती आहे 
  • पुर, दुष्काळ यांपैकी कोणत्यातरी कारणांमुळे ही संस्कृती लोप पावली असावी. 
  • शेती, भांडी बनवणे, गणित, शिलालेखन व कॅलेंडर बनवणे यात माया लोक निष्णात होते
  • भाषा तज्ञांच्या मते 'शार्क' हा शब्द माया संस्कृतीच्या बोलीभाषेतून आल्याचे सांगितले जाते.
  • माया संस्कृतीत वैद्यकशास्त्र खूप प्रगत होते. मानवी केसांनी टाके घालणे, दातांच्या किडलेल्या पोकळ भागात भर घालणे तसेच एखाद्या अवयवाच्या जागी कृत्रिम अवयव बसवणे अश्या गोष्टी ते सहज करत असत.
  • 'स्टीमबाथ'ला माया संस्कृतीत खूप महत्व होते. त्यांच्या मते स्टीमबाथ ने सगळ्या अशूद्धी दूर असत.
  • लिखाणाच्या बाबतीत माया संस्कृती प्रगत होती. 
  • माया संस्कृतीच्या लोकांची हत्यारे ज्वालामुखीच्या खडकापासून तयार केलेली असत.
  •  
Web Title: Archaeologists find incredible Mayan jade pendant