इराकमध्ये सापडली 2700 वर्ष जुनी वाईन पॅक्टरी

सिंचन कालव्यावर केलेले कोरीव कामचाही लागला शोध
 इराकमध्ये सापडली 2700 वर्ष जुनी वाईन पॅक्टरी

इराकमधील पुरातत्व शास्त्रज्ञांना रविवारी 2700 वर्षांपूर्वीच्या असिरियन राजाच्या (Assyrian kings) काळात असलेल्या वाईन फॅक्टरीचा शोध लावला. त्याचबरोबर उत्तर इराकमधील फैदा येथे साधारण 9 किलोमीटर लांब असलेल्या सिंचन कालव्याच्या भिंतीवर कोरीवकाम केलेले आढळले आहे.

या कारखान्यांवर पाच मीटर (16 फूट) रूंद आणि दोन मीटर उंच असलेल्या 12 पटलांंवर नक्षी कोरली आहे. त्यात देव, राजे आणि पवित्र प्राणी दाखवले गेले आहे. ते सरगोन II (इसवीसन पूर्व 721-705) आणि त्याचा मुलगा सनहेरीब यांच्या कारकिर्दीतले आहेत.

 इराकमध्ये सापडली 2700 वर्ष जुनी वाईन पॅक्टरी
कोरोनाचा शेवट होण्यापासून जग किती लांब? WHO प्रमुखांनी सांगितला उपाय

इटलीचे पुरातत्वशास्त्रज्ञ डॅनिएल मोरांडी बोनाकोसी यांनी, इराकमध्ये विशेषत कुर्दिस्तानमध्ये असे खडक आहेत, पण इतके मोठे स्मारक मात्र नाही, असे सांगितले. ते म्हणाले, हे कोरीव काम असिरियन देवांसमोर असीरियन राजा प्रार्थना करत असल्याचे दर्शविते, आम्हाला सात प्रमुख देवतांचे कोरीवकाम मिळाले आहे. त्यात प्रेम आणि युद्धाची देवी ईशरचा समावेश आहे. जे सिहाच्या शीर्षस्थानी चित्रित केले आहे.

शेतकऱ्यांच्या शेतात डोंगरातून पाणी वाहून नेण्यासाठी सिंचन कालवा तोडण्यात आला, असे The Mercury.com च्या वृत्तात म्हटले आहे.ज्यांनी हा आदेश दिला त्या राजांचे कोरीव काम येथे केले आहे.

'हे केवळ धार्मिक दृश्य नव्हते, ते राजकीय होते. तेथे एक प्रचार देखावा होता, असे मोरांडी बोनाकोसी म्हणाले, 'बोनाकोसींच्या मते,' त्या भागात राहणाऱ्या लोकांना राजाला कदाचितदाखवायचे होते की त्यांनीच या मोठ्या सिंचन यंत्रणा बांधल्या. त्यामुळे लोकांनी हे लक्षात ठेवून राजाशी एकनिष्ठ राहावे, असे मत बोनकोसी यांनी व्यक्त केले.

जगातील काही प्राचीन शहरांचे जन्मस्थान म्हणून इराककडे पाहिले गेले. असिरियन यांच्यासोबत ते कधीकाळी सुमेरियन आणि बॅबीलोनियन लोकांचेही घर होते. तसेच मानव जातीवर केलेल्या लेखनाच्या पहिल्या उदाहरणांपेकी एक होते. पण आता ही ठिकाणं प्राचीन कलाकृतींच्या तस्करीची ठिकाणं आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला इराकला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेने सुमारे 17,000 कलाकृती परत केल्या ज्या सुमारे 4,000 वर्षांपूर्वीच्या सुमेरियन काळातील आहेत, गिलगामेशच्या महाकाव्याचे वर्णन करणारा ३,५०० वर्षांचा टॅब्लेट तीन दशकांपूर्वी अमेरिकेत अवैध मार्गाने चोरून नेला होता तो गेल्या महिन्यात इराकला परत करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com