
जाईन्स ७५ वर्षांचे असून ते डॉक्टर आहेत. त्यांच्याशी दीर्घकाळापासून मैत्री असल्यामुळे सामान्य जनतेआधी कार्यालयात लस टोचण्यात आली असे ७१ वर्षीय पत्रकार मित्र हारॅशिओ व्हेर्बीत्स्की याने नभोवाणीवरील कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले.
ब्युनोस आयर्स - पत्रकार मित्रासह काही निकटवर्तीयांना नियम डावलून आधीच कोरोनाची लस टोचण्यात आल्याचे उघड झाल्यामुळे अर्जेंटिनाचे आरोग्य मंत्री जाईन्स गोंझालेझ गार्सिया यांना राजीनामा द्यावा लागला आहे. अध्यक्ष अल्बर्टो गोंझालेझ यांनी त्यांना तसा आदेश दिला.
जाईन्स ७५ वर्षांचे असून ते डॉक्टर आहेत. त्यांच्याशी दीर्घकाळापासून मैत्री असल्यामुळे सामान्य जनतेआधी कार्यालयात लस टोचण्यात आली असे ७१ वर्षीय पत्रकार मित्र हारॅशिओ व्हेर्बीत्स्की याने नभोवाणीवरील कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले. त्यामुळे जाईन्स यांना राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आला.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आता या खात्याची सूत्रे ४८ वर्षीय कार्ला व्हिझ्झोत्ती यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. रशियाकडून स्पुटनिक व्ही लस मिळविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. रशियन लसीला मान्यता दिलेला दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेंटिना हा पहिला देश ठरला.
सर्रास झुकते माप
अर्जेंटिनात बुधवारपासून आरोग्य कर्मचारी आणि ७० वर्षांवरील नागरीकांना लस देण्यास प्रारंभ झाला. लसीकरण मोहिमेत त्यांना प्राधान्य आहे, मात्र सरकारी अधिकारी, मंत्री यांच्या निकटवर्तीयांना आरोग्य मंत्रालयात लस टोचली जात असल्याचे वृत्त अनेक स्थानिक माध्यमांनी दिले आहे.