इम्रान खान यांच्या घरात ४० दहशतवादी लपल्याची माहिती, पोलिसांनी घातला वेढा; सरकारचा २४ तासांचा अल्टिमेटम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm imran khan

इम्रान खान यांच्या घरात ४० दहशतवादी लपल्याची माहिती, पोलिसांनी घातला वेढा; सरकारचा २४ तासांचा अल्टिमेटम

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोर पुन्हा एका नव्या अडचणीत सापडले आहेत. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या लाहोरमधील जमान पार्क येथील घरात 30-40 दहशतवाद्यांनी आश्रय घेतला आहे. यावर पंजाब प्रांत सरकारने पोलिसांना पाठवले असून त्या पोलिसांनी इम्रान खान यांच्या घराला वेढा घातला आहे, त्यामुळे दहशतवाद्यांच्या ताब्यात देण्यासाठी सरकारने 24 तासांचा अल्टीमेटम दिला आहे.

इम्रान खान यांची बेकायदेशीर अटक आणि अपहरणावरून इम्रान खान यांनी देशाच्या सरकारवर हल्ला चढवला आहे. यादरम्यान ही घटना घडली आहे. गेल्या आठवडाभरापासून देशात राजकीय गोंधळाचे वातावरण असून या नव्या घटनेने अस्थिरता आणखीन वाढली आहे.

पंजाब प्रांताचे मंत्री अमीर मीर यांनी लाहोरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना पीटीआयने या दहशतवाद्यांना सोपवावे अन्यथा कायदा आपले काम करेल असे म्हटले आहे.

मीर म्हणाले की पीटीआय आता दहशतवाद्यांप्रमाणे वागत आहे. ते म्हणाले की, पीटीआय प्रमुख इम्रान हे एका वर्षाहून अधिक काळ लष्कराला लक्ष्य करत आहेत. इम्रान खान यांच्या अटकेपूर्वी हल्ल्याची योजना आखल्याचा मीर यांनी दावा केला आहे. 9 मे रोजी आर्मी इन्स्टिट्यूटवर झालेला हल्ला सुनियोजित आल्याचे मीर म्हणाले. मीर म्हणतात की सरकारने शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. या प्रांताचे मुख्यमंत्री मोहसीन नक्वी यांनी सांगितले की, त्यांनी पोलिसांना गुन्हेगारांवर कारवाई करण्यास फ्रीहँड दिला आहे.

मिल्ट्री कोर्ट देणार शिक्षा

मीर यांना जिना हाऊसवरील हल्ल्याशी संबंधित प्रश्नही विचारण्यात आला होता. जिना हाऊसवरील हल्ला सहज रोखता आला असता, असे ते म्हणाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना शस्त्र वापरण्यापासून रोखले होते. जेणेकरून रक्तपात थांबवता येईल. कॉर्प्स कमांडरचे अधिकृत निवासस्थान असलेल्या जिना हाऊसवर झालेल्या हल्ल्यादरम्यान अनेक आंदोलक घरातील लोकांच्या संपर्कात होते. तसेच मीर पुढे म्हणाले की, सरकारने ठरवले आहे की लष्करी कार्यालयांवर हल्ला करणाऱ्यांवर लष्करी न्यायालयात खटला चालवला जाईल.

टॅग्स :PakistanPM Imran Khan