HowdyModi : गांधीजींच्या उल्लेखासह 'वैष्णव जन तो' भजनाचे गायन

Artists Sing Gandhis Favourite Song Vaishnava Jan in Howdy Modi Event
Artists Sing Gandhis Favourite Song Vaishnava Jan in Howdy Modi Event

ह्युस्टन : हाऊडी मोदी या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना खासदार स्टेनी हॉयर यांनी महात्मा गांधी जयंतीचा आवर्जून उल्लेख केला. तसेच, मोदी यांच्या भाषणापूर्वी गांधीजींचे आवडते "वैष्णव जन तो' हे भजनही वेगळ्या स्वरुपात गायकांनी गायले. 

गर्दीचा वारंवार उल्लेख 
हाऊडी मोदी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गर्दीचा वारंवार उल्लेख येथील माध्यमांद्वारे केला जात होता. "पन्नास हजार' या शब्दांवर जोर दिला जात होता. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कार्यक्रमासाठी निघताना ट्‌वीटरवर "पन्नास हजार लोकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये मोदींना भेटायला जात आहे,' असे म्हटले होते. नंतर भाषणातही ट्रम्प यांनी ज्या मोठ्या संख्येने भारतीय जमले, त्याचा दोन-तीन वेळा उल्लेख केला.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचे स्टेडियममध्ये आगमन होताच बराच वेळ पन्नास हजार अमेरिकी-भारतीयांनी केलेल्या "मोदी, मोदी' गजराने परिसर दुमदुमून गेला. हा प्रचंड जल्लोष अपेक्षित असूनही या उत्स्फुर्तपणामुळे उपस्थित अमेरिकी नेते आश्‍चर्यचकीत झाले. ह्युस्टनचे महापौर सिल्व्हेस्टर टर्नर यांनी "ह्युस्टनची प्रतिकात्मक किल्ली' देऊन मोदींचे शहरात स्वागत केले. स्वागतासाठी अमेरिकेच्या रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही प्रमुख पक्षांचे खासदार एनआरजी स्टेडियममध्ये उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com