इलॉन मस्कविरोधात बोलणं पडलं महागात, SpaceX ने कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले

सध्या इलॉन मस्कच्या विरोधात बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना SpaceX ने कामावरून काढून टाकले
elon musk
elon musksakal

इलॉन मस्क कायमच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत चर्चेत येत असतो. सध्या इलॉन मस्कच्या विरोधात बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना SpaceX ने कामावरून काढून टाकले. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. सध्या हे प्रकरण चर्चेत असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. (As employees criticised ceo Elon Musk through letter, SpaceX fires them from job)

elon musk
काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला; प्रार्थनास्थळी दिसले धुराचे लोट

इलॉन मस्क यांच्या गैरवर्तनावर टीका करणारे एक खुले पत्र लिहिण्यात आले होते आणि त्याला प्रसारित करण्यात होते. याला कामगारांचा पाठिंबा होता असे समोर आले त्यानंतर शुक्रवारी SpaceX ने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. तेथील कर्मचाऱ्यांचा हवाला देऊन न्युयॉर्क टाईम्सने या घटनेला दुजोरा दिला.

elon musk
'या' रेस्टॉरंटमध्ये जेवणासोबत चाटावी लागते भिंत, वाचा काय आहे प्रकरण

स्पेसएक्सचे अध्यक्ष ग्वेन शॉटवेल यांनी ईमेल पाठवून सांगितले की कंपनीने या पत्राची चौकशी केली आहे आणि संबंधित कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. मात्र किती कामगारांना काढण्यात आले आहे, याचा अद्याप आकडा समोर आलेला नाही.

कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या या पत्रात मस्कवर टीका करत खिल्ली उडवली होती. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. तर नेटकरी स्पेसएक्सच्या निर्णयावर जोरदार टीका करत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com