पित्याच्या प्रशासनात नोकरी करणार नाही - ॲश्ली

यूएनआय
Thursday, 21 January 2021

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांची कन्या ॲश्ली यांनी आगळा संकल्प सोडला. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका हिच्याप्रमाणे पित्याच्या प्रशासनात नोकरी करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांची कन्या ॲश्ली यांनी आगळा संकल्प सोडला. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका हिच्याप्रमाणे पित्याच्या प्रशासनात नोकरी करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

ॲश्ली ३९ वर्षांच्या आहेत. त्यांनी एनबीसी या आघाडीच्या दूरचित्रवाणी वाहिनीवरील टुडे या लोकप्रिय कार्यक्रमात मुलाखत दिली. निवडणुकीनंतर तिची ही पहिलीच मुलाखत आहे. ती डेलावेअरची रहिवासी असून समाजसेविका आहे. पित्याच्या अध्यक्षपदाच्या रूपाने मिळालेले व्यासपीठा वापरून सामाजिक न्याय आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रांमधील उपक्रमांना चालना देण्याची तिची इच्छा आहे. इव्हांकाप्रमाणेच तिचे पती जॅरेड कुशनर हे सुद्धा ट्रम्प प्रशासनात सल्लागारपद भूषवायचे. यासंदर्भात ॲश्लीने अप्रत्यक्ष टोला लगावल्याचे मानले जाऊ शकते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ॲश्ली यांनी सांगितले की, तुम्हाला कल्पना असल्याप्रमाणे काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आणि विषयांबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि पूरक शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करण्याची मला आशा आहे. ॲश्ली यांचा प्लॅस्टिक सर्जन हॉवर्ड क्रेईन यांच्याशी विवाह झाला आहे. पित्याच्या निवडणूक प्रचारात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

अमेरिका ‘युनायटेड’ : ज्यो बायडेन - कमला हॅरिस पर्वाला प्रारंभ

सोशल मीडियावर नाही
प्रचारादरम्यान ॲश्ली यांच्या कुटुंबावर चिखलफेक झाली. त्यासंदर्भात त्या म्हणाल्या की, इतके निष्ठुर आणि क्षुद्र आरोप झाले. त्यामुळेच मी सोशल मीडियावर जाहीरपणे नाही. याचा एक भाग म्हणजे मी स्वतःसाठी सीमा आखून घेतल्या आहेत.

बायडेन यांचा शपथविधी ठरला ऐतिहासिक; वाचा सोहळ्याची खास वैशिष्ट्ये 

आईमुळे वडील जमिनीवर
आई जील अत्यंत करारी आणि निष्ठावान आहे. तिच्यामुळे वडील नेहमी जमिनीवर राहतात. कचऱ्याचा डबा बाहेर काढून ठेवा, सिरिअल्स खाऊन झाल्यावर बाउल उचलून ठेवा, अशा सूचना त्या नेहमी करतात, असे ॲश्ली यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashley Biden Will not work in fathers administration