अफगाणिस्तान अध्यक्षपद निवडणूक; अश्रफ घनी यांचा विजय निश्चित

वृत्तसंस्था
रविवार, 22 डिसेंबर 2019

निकालापूर्वी आक्षेपास संधी

काबूल : अफगाणिस्तानमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अश्रफ घनी हे पुन्हा एकदा अध्यक्षपदावर निवडून येण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. 28 सप्टेंबरला निवडणुकीनंतर झालेल्या प्राथमिक मतमोजणीनंतर त्यांना 50.64 टक्के मते मिळाली असून, त्यांचे प्रमुख विरोधक अब्दुल्ला यांना केवळ 39.52 टक्के मते मिळाली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

घनी यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. मात्र, जेव्हा या निवडणुकीचा अंतिम निकाल समोर येईल, तेव्हा प्रतिस्पर्धी उमेदवाराला काही आक्षेप असेल तर तक्रार दाखल करण्याचा अवधी मिळणार आहे. त्यासाठी या आठवड्यात त्यांना तक्रार दाखल करावी लागणार आहे.

Image result for अश्रफ घनी

SBI मध्ये अकाउंट आहे? एटीएम कार्ड होणार बंद

याबाबत प्रतिस्पर्धी अब्दुल्ला यांनी सांगितले, की पुन्हा एकदा आमचे लोक, समर्थक, निवडणूक आयोग आणि आमचे आंतरराष्ट्रीय सहकारी कोण आहेत, ते स्पष्ट करायला हवे. आम्हाला पाठिंबा देणारे जोपर्यंत याची योग्यप्रकारे पडताळणी होत नाही, तोपर्यंत हा निकाल स्वीकारणार नाहीत. 

सरकारकडून धार्मिक व सामाजिक ऐक्यास धोका : शरद पवार

निकालापूर्वी आक्षेपास संधी

निवडणुकीचा अंतिम निकाल हाती येण्यापूर्वी संबंधित उमेदवारांना निकालांवर आक्षेप घेण्याची संधी दिली जाते. त्यानुसार या निकालाला आव्हान देणार असल्याचे अब्दुल्ला यांनी आधीच जाहीर केले आहे.  

Image result for afghanistan flag

निवडणूक आयोगाचे प्रमुख हवा आलम नुरीस्तानी यांनी सांगितले, की आम्ही प्रामाणिकपणे, जबाबदारीपूर्वक आणि विश्वासपूर्वक मतमोजणीची जबाबादरी पार पाडली आहे. आम्ही प्रत्येक मताचा योग्य मान राखत लोकशाहीचा सन्मान केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashraf ghani will win Afghanistan Presidential Election