अल् कायदाचा दक्षिण आशियातील म्होरक्या ठार

Asif Umar
Asif Umar

काबूल : अल् कायदा या दहशतवादी संघटनेचा दक्षिण आशियातील म्होरक्या असिम उमर याला ठार मारण्यात अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाला यश आले आहे. 

अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या संयुक्त कारवाईत आसिम उमर या जहाल दहशतवाद्याला ठार यश आले आहे. अफगाणिस्तानमधील हेल्मंड प्रांतात करण्यात आलेल्या कारवाईत तो ठार झाला आहे. उमर हा पाकिस्तानी नागरिक होता. उमरसोबतच अन्य 6 दहशतवाद्यांनाही ठार मारण्यात आले आहे. उमर हा भारतात दहशतवादी कारवाया वाढविण्यासाठी प्रयत्नशील होता.

अल् कायदाने अद्याप त्याच्या हत्येला दुजोरा दिला नाही. अफगाणिस्तान आणि अमेरिकेने गेल्या महिन्यात एक संयुक्त मोहिम राबवली होती. त्यात 22, 23 सप्टेंबरला उमर ठार झाला होता. मात्र ही माहिती बाहेर आली नव्हती. 8 ऑक्टोंबरला उमर ठार झाल्याच्या माहितीला पुष्टी देण्यात आली. उमरसोबत जे दहशतवादी ठार झाले होते तेही सर्व पाकिस्तानी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com