झोपोरिझिया न्युक्लिअर प्लांटवर हल्ला... रशियाच्या रडारवर 15 अणुभट्ट्या?

युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर प्लांटवर रशियाने हल्ला केल्याचं समोर माहिती समोर येत आहे.
History Nuclear Power Plants in Ukraine
History Nuclear Power Plants in UkraineSakal

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध सुरु होऊन आठवडा पूर्ण झाला आहे, अजूनही युद्ध थांबण्याच्या कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. रशियाने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत युक्रेनच्या विविध भागांवर हल्ले चालूच ठेवले आहेत. यादरम्यान युक्रेनमधील तसेच युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर प्लांटवर (Zaporizhzhia NPP) रशियाने हल्ला केल्याचं समोर माहिती समोर येत आहे. या अणुऊर्जा प्रकल्पातून धूराचे लोट उठल्याचे दिसत आहे. युक्रेनमध्ये एकूण 15 अणुभट्ट्या आहेत. या अणुभट्ट्यांवर रशियानं हल्ला केला तर फक्त युक्रेनच नाही तर युरोपमधील आणखी देशांना त्याचा परिणाम भोगावा लागू शकतो. युक्रेनमधील अणुभट्ट्यांविषयी आपण माहिती घेणार आहोत. (Nuclear Power Plants in Ukraine)

युक्रेनचा अणुऊर्जा उद्योग किती मोठा आहे?

रशिया युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्प चर्चेत आहेत. युक्रेन मोठ्या प्रमाणावर अणुऊर्जेवर अवलंबून आहे. युक्रेनमध्ये 15 अणुभट्ट्या असून युक्रेनमधील एकूण वीजेच्या जवळपास 50 टक्के वीज ही या अणुभट्ट्यांमध्ये निर्माण केली जाते. सध्याच्या सर्व अणुभट्ट्या रशियन-डिझाइन केलेल्या VVER प्रकारच्या आहेत.

युक्रेनमधील अणुऊर्जेचा इतिहास काय आहे?

1970 मध्ये अणुऊर्जा विकासाला सुरुवात झाली. तेव्हा युक्रेन तत्कालीन सोव्हिएत युनियनचा भाग होता. चेर्नोबिल पॉवर प्लांट हा युक्रेनमधील पहिला अणुऊर्जा प्रकल्प होय. त्याचे पहिले युनिट 1977 मध्ये कार्यान्वित झाले आणि चौथे युनिट 1983 मध्ये सुरु झाले. 1986 मध्ये झालेल्या अपघातानंतर, 1989 मध्ये युनिट 5 आणि 6 रद्द करण्यात आले.

सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाल्यानंतर देश हे क्षेत्राचा विकास स्थिर राहिला. 1995 च्या अखेरीस झापोरोझ 6 प्रकल्प सुरु झाला. झोपोरिझिया ही युरोपमधील सर्वात मोठे अणुऊर्जा केंद्र बनले. याची क्षमता 5700 MWe आहे. ऑगस्ट आणि ऑक्टोबर 2004 मध्ये खमेलनित्स्की 2 आणि रोव्हनो 4 प्रकल्पांची भर पडली.

रशियन अणुभट्ट्यांचे मूळ डिझाइन आयुष्य 30 वर्षे होते. परंतु हा मर्यादा वाढवली गेली आहे.सप्टेंबर 2021 मध्ये युक्रेनियन सरकारी अणुऊर्जा कंपनी एनरगोएटॉमने अमेरिकन फर्म वेस्टिंगहाउसशी देशात चार AP1000 अणुभट्ट्या बांधण्यासाठी करार केला होता.

युक्रेनच्या आण्विक इंधनाचे काय?-

युक्रेनला दोन इंधन पुरवठादारांपर्यंत प्रवेश आहे रशियाचा TVEL आणि Westinghouse. युक्रेनच्या अणुभट्ट्यांमधील बहुतेक इंधन TVEL द्वारे उत्पादित केले जाते. 2021 च्या मध्यापर्यंत, युक्रेनच्या 15 पैकी 6 अणुभट्ट्यांमध्ये वेस्टिंगहाऊसने उत्पादित इंधन वापरले जात होते.

आपात्कालीन परिस्थितीत काय केले जाते?-

या अणुभट्ट्यावंर बॉम्बहल्ला झाल्यास धोका दूर होईपर्यंत प्लांट बंद केला जातो आणि अनलोड केला जातो. अणुऊर्जा प्रकल्पातील बाह्य वीज पुरवठा खंडित झाल्यास शक्तिशाली डिझेल जनरेटरद्वारे वीज पुरवठा केला जातो. युक्रेनियन अणुऊर्जा प्रकल्प अशा प्रकारच्या ऑपरेशनसाठी तयार असतात. याव्यतिरिक्त, युक्रेनियन पॉवर युनिट्स विमान अपघातासाठी देखील तयार आहेत, कारण या अणुभट्ट्या अशा जोखमींना तोंड देण्यासाठी डिझाइन केलेल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com