रशियाच्या सुरक्षेसाठीच युक्रेनवर हल्ला

पुतीन यांच्याकडून युद्धाचे समर्थन; लक्ष्य साध्य करणारच
Russia president Vladimir putin ukraine attack
Russia president Vladimir putin ukraine attack Sakal

मॉस्को : रशियाच्या सुरक्षेसाठीच युक्रेनवर हल्ला केल्याचे समर्थन रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी केले आहे. तसेच, आपण ठरविलेले लक्ष्य साध्य करणारच, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पुतीन म्हणाले की, रशियाचा शेजारी असूनही युक्रेनने आमच्याविरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे फुटीरतेची बीजे पेरली जात होती. त्यामुळे रशियाबरोबरच पूर्व युक्रेनमधील नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी युक्रेनवर कारवाई करणे भाग पडले. कारवाई सुरु करण्यापूर्वी आम्ही काही निश्‍चित उद्दीष्टे समोर ठेवली असून ती आम्ही साध्य करणारच.

एकटे पाडणे शक्य नाही

आम्हाला एकटे पाडता येणार नाही, असा इशारा रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी आज जगाला दिला. ‘जगापासून फटकून राहण्याची रशियाची अजिबात इच्छा नाही. त्याचप्रमाणे, रशियासारख्या विशाल देशाला एकटे पाडणेही कोणालाही शक्य नाही. आमच्याशी सहकार्य करू इच्छिणाऱ्या देशांबरोबर आम्ही आघाडी करू,’ असे पुतीन यांनी सांगितले.

युद्धगुन्ह्यांची चौकशी सुरु

किव्ह : रशियाने युद्धगुन्हे केल्याचा आरोप करणाऱ्या युक्रेनने आज एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी तपास सुरु केला आहे. रशियन सैनिकांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात त्याचा मृत्यू झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com