Australia Fire : जगप्रसिद्ध ठिकाणं झाली बेचिराख, आग लागण्याआधीचे फोटो पाहा !

वृत्तसंस्था
Monday, 13 January 2020

Australia Fire : ऑस्ट्रेलियातील सुंदर ठिकाणं आगीमध्ये राख झाली. घरं, ठिकाणं आणि निर्सगाची झालेली हानी संपूर्ण जगासमोर आली आहे. अशा काही ठिकाणांचे आधीचे आणि आत्ताचे फोटो आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. 

सिडनी : गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियात पेटलेल्या वणव्यामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत 23 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर, 50 कोटींच्यावर प्राणी आणि पक्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. यामध्ये कोआल आणि कांगारु यांची संख्या सर्वाधीक आहे. ऑस्ट्रेलियातील या आगीच्या परिणामाची झळ शेजारील देश न्युझीलंडलाही बसली आहे. ऑस्ट्रेलियातील सुंदर ठिकाणं आगीमध्ये राख झाली. घरं, ठिकाणं आणि निर्सगाची झालेली हानी संपूर्ण जगासमोर आली आहे. अशा काही ठिकाणांचे आधीचे आणि आत्ताचे फोटो आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. 

Image may contain: ocean, sky, outdoor, nature and water

1. Tathra समुद्रालाही या आगीने सोडलं नाही. या वणव्य़ाची तीव्रता इतकी जास्त होती की अथांग पसरलेल्या समुद्रालाही त्याची झळ बसली. भयंकर आगीमुळे निळ्याशार समुद्राचं रुपांतर पिवळ्य़ा रंगात झालेलं दिसत आहे. 
Photo: Bored Panda

Image may contain: ocean, beach, sky, outdoor, water and nature

2. कांगारु आयलंड एका भयानक जागेपेक्षा कमी दिसत नाही. राष्ट्रीय प्राणी असलेल्या आणि जगामध्ये सर्वाधीक कांगारु आढळणाऱ्या देशात कांगारु आयलंडची राख झाली आहे. 
Photo: Bored Panda

Image may contain: sky, tree, plant, outdoor and nature

3. कांगारु आयलंडमधून जाणारा हा रस्ता. झाडांनी हरवलेल्या या रस्तावर आता एकेही झाड उरलेले नाही. 
Photo:  Google 

Image may contain: tree, sky and outdoor

4. झाडांनी बहरलेलं हे जंगल आता काळ्या रंगात बदललं आहे. निळ्याशार आकाशात लाल आगीची झळ आणि फक्त धूरच धूर दिसतो आहे. 
Photo: Bored Panda

Image may contain: outdoor

5. आगीमधून या घराचा बचाव झालाय़ !  पण, त्याच्या बाजुला भीषणता पसरेय. आगीने आणखी एक जागा बिचिराख केली त्याचा एरिअल व्ह्यु. 

Image may contain: one or more people, sky and outdoor

6. Mallacoota Wharf केशनसाठी ही जागा उत्तम असू शकेत पण आता त्याचं एका नरकार रुपांतर झालयं. निऴ्या आकाशाचा लाल भयानक रंग झालाय.

Photo: Bored Panda

Image may contain: tree, sky, grass, outdoor and nature

7. एखाद्या चित्राप्रमाणे दिसणारं हे स्थळ आगीमध्ये भस्म झालं आहे. सुंदर हिरवेगार झाड, पाणी आणि खुले आकाश, सर्वकाही आगीमध्ये गेलं आहे. याची नुकसान भरपाई होण्याकरीता नक्कीच बराच काळ उलटेल. 
Photo: Bored Panda

Image may contain: sky, cloud, mountain, outdoor and nature

8. ढगांच्य़ा जागी धुरांचा लोट ! ऑस्ट्रेलियाच्या आगीची भीषणता. 
Photo: Bored Panda

Image may contain: cloud, sky, mountain, outdoor and nature

9. Mallacoota या जागेचा आधीचा एअरल व्ह्यु आणि आगीनंतर सर्वत्र लाल झालेले शहर. 

Image may contain: sky, tree, house, outdoor and nature

10. एका घराची भयानक अवस्था. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia Fire photos of places before the damage by fire