भारतीय वंशाच्या तिघांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च सन्मान
मेलबर्न : सामाजिक कार्य आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल ऑस्ट्रेलिया सरकारने भारतीय वंशाच्या तिघांना सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे. पुरुषोत्तम सावरीकर, माखनसिंग खांगुरे आणि विजय कुमार अशी या तिघांची नावे असून, त्यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया मेडल 2017 जाहीर करत असल्याचे येथील सरकारने काल (ता. 26) सांगितले.

सावरीकर यांचा सिडनी येथे वैद्यकीय व्यवसाय आहे. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग भारतीय समुदायासह सर्वच नागरिकांसाठी करत व्यापक जनहित साधल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देत असल्याचे सरकारने म्हटले आहे. सावरीकर हे ऑस्ट्रेलियन इंडियन मेडिकल ग्रॅज्युएट्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून, त्यांनी आकाशवाणी सिडनीचीही स्थापना केली आहे. पर्थ येथे राहणारे माखनसिंग खांगुरे यांनीही न्यूरोरेडिओलॉजी, शिक्षण आणि इतर वैद्यकीय संघटनांच्या माध्यमातून जनतेची सेवा केल्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. विजय कुमार हे न्यूक्लिअर मेडिसीन तज्ज्ञ आणि संशोधक आहेत. न्यूक्लिअर मेडिसीन आणि जीवशास्त्र यामध्ये त्यांनी केलेल्या संशोधनकार्याबद्दल ऑस्ट्रेलिया सरकारने त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. कुमार हे सिडनी येथील तमीळ संगम संघटनेचेहे सदस्य आहेत. त्यांना न्यूक्लिअर सायन्स क्षेत्रामधील योगदानाबद्दलही 2007 आणि 2014 मध्ये पुरस्कार मिळाला होता.