ऑस्ट्रेलियातील कटामागे "इसिस'चा हात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

अटक केलेल्या एका दहशतवाद्याने त्याच्या एका भावाला अंधारात ठेवत त्याच्या जवळ स्फोटके असलेली बॅगही सोपविली होती. मात्र, कडक सुरक्षेमुळे त्यांना तो अमलात आणता आला नाही

सिडनी - विमानामध्ये स्फोट घडवून आणण्याचा कट रचल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात येथे चार जणांना अटक केल्यानंतर, या कटामागे "इसिस'चा हात असल्याचे उघड झाले आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी विषारी वायू सोडण्याप्रकरणीही इतर दोन जणांना अटक झाल्याचे येथील पोलिसांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात पोलिसांनी पाच ठिकाणी छापे घालून चार जणांना बॉंब तयार करण्याच्या साहित्यासह अटक केली होती. येथील एतिहाद विमानतळावरील एका मालवाहतूक करणाऱ्या विमानात हा स्फोट घडविण्याचा कट रचण्यात आला होता. अटक केलेल्या एका दहशतवाद्याने त्याच्या एका भावाला अंधारात ठेवत त्याच्या जवळ स्फोटके असलेली बॅगही सोपविली होती. मात्र, कडक सुरक्षेमुळे त्यांना तो अमलात आणता आला नाही.

Web Title: australia isis terrorism

टॅग्स