ऑस्ट्रेलियातील हल्ल्यामागे दहशतवाद्यांचा हात : माल्कन टर्नबूल

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जून 2017

मेलबर्न : ब्रिग्टन येथे काल झालेल्या स्फोटानंतर महिलेला ओलीस ठेवण्याच्या प्रकरणामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे पंतप्रधान माल्कन टर्नबूल यांनी आज स्पष्ट केले. या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

ब्रिग्टनमधील एका अपार्टमेंटमध्ये ओलीस ठेवलेल्या एका महिलेची काल (ता.5) पोलिसांनी सुटका केली होती. या कारवाईत संबंधित हल्लेखोर ठार झाला होता. तत्पूर्वी झालेल्या स्फोटात एक नागरिकही मृत्युमुखी पडला होता. तर, कारवाईदरम्यान तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.

'हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे पुरावे अद्यापी समोर आले नसले तरी, त्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कारवाईत ठार झालेला हल्लेखोर याकूब हा नुकताच जामिनावर सुटला होता. त्याच्यावर दहशतवादासारखे गंभीर आरोप असताना त्याची मुक्तता होणे, ही बाब धक्कादायक असून, त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,' असे टर्नबूल यांनी सांगितले.

इतर देशांबरोबर ऑस्ट्रेलियालाही दहशतवादाचा धोका असून, त्याविरोधात आपला लढा कायम राहील, असेही टर्नबूल म्हणाले.

Web Title: Australia news Melbourne terror attack terrorism Marathi News