वणव्यामुळे ऑस्ट्रेलियात आणीबाणी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

वणवा पेटलेला असताना पंतप्रधान स्काॅट माॅरिसन परदेश दाैऱ्यावर असल्यामुळे जनतेमध्ये संतप्त भावना दिसून आली. माॅरिसन तुम्ही काेठे आहात ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.

सिडनी : ऑस्ट्रेलियात गेल्या अनेक दिवसांपासून वन क्षेत्रातील वणवा विझविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे वणव्याच्या भक्ष्यस्थानी माेठे वन क्षेत्र आले आहे. त्याशिवाय रहिवासी भागावरही संकट ओढावले आहे.

दरम्यान, बुधवार आतापर्यंतचा सर्वाधिक तापमानाचा दिवस ठरला. १८ डिसेंबरचे कमाल तापमान ४१.९ अंश सेल्सियस नाेंदवण्यात आले. १६ राेजी तापमान ४०.९ हाेते. २०१३ मध्ये ४०.३ अंश सेल्सियसची नाेंद आढळून येते. केवळ चाेवीस तासांतच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बर्ड्सव्हिले येथे सर्वाेच्च तापमान ४७.७ अंशांवर नाेंदले गेले. पूर्वी सरासरी २२ ते २५ दरम्यान असे. बुधवार संपूर्ण ऑस्ट्रेलियात सर्वात उष्ण दिवस ठरला. देशातील ७०० ठिकाणी उष्णता वाढीची नाेंद घेण्यात आली आहे. न्यू साऊथ वेल्समध्ये १०० ठिकाणी वणवे असून गेल्या अनेक महिन्यांपासून आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत, परंतु त्यात यश आलेले नाही. देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली.

माॅरिसन तुम्ही काेठे आहात?- वणवा पेटलेला असताना पंतप्रधान स्काॅट माॅरिसन परदेश दाैऱ्यावर असल्यामुळे जनतेमध्ये संतप्त भावना दिसून आली. माॅरिसन तुम्ही काेठे आहात ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. गुरुवारी त्यांच्या सिडनीतील निवासस्थानाबाहेर शेकडाे लाेकांनी निदर्शने केली. साेशल मीडियावरूनही माॅरिसन यांच्यावर टीकेची झाेड उठवण्यात आली. सुमारे ५०० लाेकांनी हवामान बदलावर याेग्य पावले उचलण्याची मागणीही या वेळी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia warns of huge rise in temperature emergency declared in the country environmentalists protest outside prime ministers