Coronavirus : कोरोनाची लस शोधण्यात संशोधकांना यश; चाचणीत दिसले सकारात्मक परिणाम!

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 मार्च 2020

लस वापरण्यायोगे तयार होण्यासाठी जवळपास 18 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

सिडनी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यानंतर आता या व्हायरसवर लस शोधण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील संशोधकांना यश मिळाले आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संशोधकांनी शोधलेल्या या दोन औषधांचे परिणाम कोरोना रुग्णांवर सकारात्मक दिसले आहेत. आता लवकरच मोठ्या प्रमाणात या औषधांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत, अशी माहिती संशोधक असलेल्या डेविड पिटर्सन यांनी दिली.

Image may contain: 1 person, suit

- Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने घेतला मोठा निर्णय!

सध्या मलेरिया आणि एड्स यावर इलाज करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा परिणाम लॅबमध्ये चांगल्या प्रमाणात दिसला. मलेरियाच्या उपचारासाठी वापरण्यात येणारे क्लोरोक्विनचा कोरोनाच्या इलाजासाठी वापर केला जाऊ शकतो. चीनमध्ये त्या औषधाचे परिणाम समाधानकारक दिसून आले होते. तसेच चीनमध्ये बरेच रुग्ण इलाजानंतर पूर्णपणे बरे झाल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

- कच्च्या तेलाला मिळाला १६ वर्षांतील सर्वात कमी दर!

वैद्यकीय तपासण्या करताना हे औषध कोरोना बाधितांना दिल्यानंतर त्यांच्या शरीरातील कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट झाला. हे औषध खरंच कोरोनाचा इलाज ठरु शकतो असा दावा देखील त्याच्याकडून केला गेला आहे.

Image may contain: flower and plant

- Nirbhaya Case : अखेर निर्भयाच्या दोषींना उद्या फाशी

लस वापरासाठी लागणार 18 महिने

लस वापरण्यायोगे तयार होण्यासाठी जवळपास 18 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. सध्या काही लोकांवर चाचण्या घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australian researchers set to begin clinical trials on coronavirus cure