G20 in India : अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतला रिक्षा प्रवासाचा आनंद; 'चाय पे चर्चा'ही केली | Auto-rickshaw ride masala chai How Antony Blinken concluded his G20 India visit | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Antony Blinken
G20 in India : अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतला रिक्षा प्रवासाचा आनंद; 'चाय पे चर्चा'ही केली

G20 in India : अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतला रिक्षा प्रवासाचा आनंद; 'चाय पे चर्चा'ही केली

G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी भारतात आलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी शुक्रवारी परत जाण्यापूर्वी अमेरिकेच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांची भेट घेतली. परत जाण्यापूर्वी ब्लिंकन यांनी रिक्षाची सफर केली, तसंच मसाला चहाही पिला.

देशातील विविध शहरांमध्ये राहणारे अमेरिकन नागरिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समूह नवी दिल्लीत ब्लिंकन यांना भेटला. या भेटीनंतर, ब्लिंकन यांनी ट्वीट केलं. ते म्हणालं, "भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे". अँटनी ब्लिंकन यांनी मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि चेन्नई येथील अमेरिकन दूतावासातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

ब्लिंकन यांनी एक फोटोही शेअर केला आहे. ते एका ऑटो-रिक्षातून उतरताना दिसत आहेत. त्यांच्या सोबत काही कर्मचारीही होते. दिल्लीतील अमेरिकी दूतावासाने ब्लिंकनच्या ऑटो-रिक्षा सफरीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

ब्लिंकन यांनी आज नवी दिल्लीत महिला नागरी समाजाच्या नेत्यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी मसाला चहाचा आस्वादही घेतला. बैठकीदरम्यान, त्यांनी महिला सक्षमीकरणावरील त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यावर चर्चा केली. द्विपक्षीय बैठकीच्या यशस्वी फेऱ्या पार पाडल्यानंतर ते आज आपल्या देशात रवाना झाले.