चरबीयुक्त अन्नपदार्थ खाणे टाळा...

वृत्तसंस्था
शनिवार, 5 मे 2018

जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला; हृदयाशी संबंधित आजारांचा धोका

न्यूयॉर्क: रक्तवाहिन्यांना अडथळा ठरेल असे चरबीयुक्त अन्नपदार्थ खाणे टाळावे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगभरातील नागरिकांना दिला आहे.

हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या विकारांमुळे जगात एक कोटी 70 लाख जणांचा मृत्यू होतो. हे मृत्यू रोखण्यासाठी "डब्ल्यूएचओ'ने मोहीम सुरू केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला; हृदयाशी संबंधित आजारांचा धोका

न्यूयॉर्क: रक्तवाहिन्यांना अडथळा ठरेल असे चरबीयुक्त अन्नपदार्थ खाणे टाळावे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगभरातील नागरिकांना दिला आहे.

हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या विकारांमुळे जगात एक कोटी 70 लाख जणांचा मृत्यू होतो. हे मृत्यू रोखण्यासाठी "डब्ल्यूएचओ'ने मोहीम सुरू केली आहे.

ज्या अन्नपदार्थांमध्ये "सॅच्युरेटेड फॅट्‌स' व "ट्रान्स फॅट्‌स' असतात त्यांचा संबंध हृदयरोगाशी येतो. यासाठी असे पदार्थ टाळण्यासाठी जागृतीचे काम या मोहिमेतून केले जाते. बटर, अंड्याचा बलक, रावस मासा व गाईचे दूध यात "सॅच्युरेटेड फॅट्‌स' असतात, असे "डब्ल्यूएचओ'च्या नव्या अहवालात म्हटले आहे. शरीराला दररोज जितकी ऊर्जा आवश्‍यक असते त्याच्या दहा टक्‍क्‍यांपर्यंत अशा पदार्थांचे सेवन आहारातून कमी करावे, असा सल्ला प्रौढांना व मुलांना या अहवालातून दिला आहे; तसेच भाजलेले, तळलेले व खाद्यतेलातून शरीरात तयार होणाऱ्या "ट्रान्स फॅट्‌स' पदार्थांचे सेवन एक टक्‍क्‍यापर्यंत कमी करण्याचे आवाहनही केले आहे.

""ट्रान्स फॅट्‌स'युक्त पदार्थांच्या अतिसेवनाचा धोका टाळण्यासाठी अशा पदार्थांच्या उत्पादनात हायड्रोजनयुक्त वनस्पती तेलाच्या वापरावर सरकारने निर्बंध घालणे आवशयक आहे,'' असे "डब्ल्यूएचओ'च्या पोषण आहार विभागाचे संचालक डॉ. फ्रान्सिस्को ब्रांका यांनी सांगितले. "ट्रान्स फॅट्‌स' अन्नपदार्थांवर अनेक देशांनी बंदी आणली असली, तरी ग्राहकांपर्यंत ही बाब पोचलेली नाही. त्यामुळे उत्पादक त्यात गुणधर्माचे अन्य "फॅट्‌स' वापरू शकतात व "ट्रान्स फॅट्‌स'विना चांगले पदार्थ ग्राहकांना उपलब्ध होऊ शकतात.

गरीब देशांमध्ये जागृती आवश्‍यक
चरबीयुक्त अन्न टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचनापत्र "डब्ल्यूएचओ'कडून या वर्षाच्या अखेरिस प्रसिद्ध करण्यात येणार आहे; पण त्यापूर्वी याबाबत जगजागृती करण्यासाठी जगभरात सार्वजनिक सल्ला कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संघटनेचा विचार आहे. "डब्ल्यूएचओ' 2002मध्ये प्रथम "सॅच्युरेटेड फॅट्‌स' व "ट्रान्स फॅट्‌स'संदर्भात मार्गदर्शिका प्रसिद्ध केली होती. त्यानंतर प्रामुख्याने विकसित देशांत याबाबत मोठ्या प्रमाणात जागृती झाल्याचे दिसून येते. पश्‍चिम युरोपमधील खाद्यान्नातून "ट्रान्स फॅट्‌स' हद्दपार झाले आहे, तर डेन्मार्कमध्ये त्यावर बंदी आहे. तरी गरीब व अविकसित देशांत अशा अन्नपदार्थांचा धोका कायम असल्याची खंत डॉ. ब्रांका यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avoid eating fat fatty foods ...