मंगळावर होणार युद्ध आणि युरोपची लोकसंख्या शून्य; 'बाबा वंगा'च्या भविष्यवाण्या चर्चेत

baba vanga 1.jpg
baba vanga 1.jpg

बल्गेरियातील भविष्यवक्ता बाबा वंगा आणि त्यांच्या भविष्यवाण्या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. वेंगाला ‘बाल्कनमधील नास्ट्रेडॅमस’ म्हणूनही ओळखले जाते. असा दावा केला जातो की, त्यांनी केलेल्या सर्व भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या. फ्रान्स आणि अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यांपासून ते त्सुनामी, फुकुशिमा अपघात आणि इसिस यासारख्या दहशतवादी संघटनांच्या घटनांच्या भाकितांना बाबा वंगाने नुकतेच वर्तविले होते. 2016 मध्ये बाबा वंगानेही मुस्लिम दहशतवाद्यांकडून युरोपवर हल्ल्याची भविष्यवाणी केली होती. इतकेच नव्हे तर 2010 मध्ये मिडल ईस्टमध्ये संघर्ष सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले होते. येत्या काळात मंगळावर युध्द होईल अशी देखील भविष्यवाणी त्यांनी केली आहे.  जाणून घ्या थक्क करणाऱ्या भविष्यवाण्या...

कोण आहेत बाबा वंगा?
बल्गेरियात जन्मलेले मूळ नाव वेंगेलिया पांडेवा दिमित्रोवा असे असून त्या 12 वर्षे सामान्य जीवन जगल्या. यानंतर एका रहस्यमय वादळात त्यांनी त्यांची दृष्टी गमावली. बऱ्याच दिवसांनी तिला कुटुंब मिळाले पण तिचे डोळे त्यांना बघू शकत नव्हते. असे म्हणतात कि, दृष्टी नसूनही, बंद डोळ्यांनीच त्या बरेच काही पाहत असे आणि भविष्यवाणी करून लोकांना मदत करीत असे.

50 वर्षात सुमारे 100 भविष्यवाण्या..

बाबा वंगा ही बल्गेरियात जन्मलेली अंध भविष्यवक्ता होती. रशिया आणि युरोपमध्ये बराच काळ संत म्हणून त्यांचा सन्मान झाला. वयाच्या 85 व्या वर्षी 1996 मध्ये त्यांचे निधन झाले. वंगाने तिच्या 50 वर्षात सुमारे 100 भविष्यवाण्या केली. यातील बहुतेक भविष्यवाण्या सत्य ठरल्या. त्यांच्या बऱ्याच भविष्यवाणी हवामान आणि नैसर्गिक आपत्तीशी संबंधित होत्या. त्यांनी राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांची भविष्यवाणी देखील केली आहे. 2001 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ले आणि 2004 मध्ये त्सुनामीमुळे आफ्रिकन अमेरिकन वंशाच्या व्यक्तीला अमेरिकेचे अध्यक्ष आणि 2010 च्या अरब वसंताची देखील भविष्यवाणी केली होती.
 
 वांगाने भविष्यात केलेल्या भविष्यवाण्या; जाणून घेऊया. 

-बाबा वांगाने धर्म आणि राजकीय भविष्याविषयी देखील भाकीत केले आहेत. 

-वंगाने 1950 च्या ग्लोबल वार्मिंग आणि 2004 च्या त्सुनामीचा अंदाज देखील वर्तविला होता. 

-1980 ची भविष्यवाणी - 2000 मध्ये रशियन आण्विक पाणबुडी बुडण्याची घटना. आंतरराष्ट्रीय बचाव दलाच्या कर्मचार्‍यांकडून बर्‍याच दिवसांपासून समुद्रातून जहाज बाहेर काढण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि त्यांचा मृत्यू

-1989 मध्ये अमेरिकेत दहशतवादी हल्ल्याची घटना - 11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्क ट्विन टॉवरवर दहशतवादी हल्ला. या भविष्यवाणीनुसार ट्विन टॉवरवर दोन अपहृत पॅसेंजर विमाने हल्ला करतील, ज्यामुळे निष्पाप लोकांचा रक्तपात होईल.

-बाबा वंगाच्या अंदाजानुसार पृथ्वीवरील बर्फाच्छादित भाग उष्ण होतील आणि तिथे ज्वालामुखी सक्रिय होतील. 

-समुद्राच्या प्रचंड लाटांनी शहरं व्यापतील आणि सर्व काही पाण्याच्या प्रवाहात अदृश्य होईल.

या भविष्यवाण्या सुद्धा खऱ्या ठरल्या
-अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष आफ्रिकन-अमेरिकन आणि बराक ओबामा अमेरिकन अध्यक्ष होतील.
-जार बोरिस -3 च्या मृत्यूची तारीख (बल्गेरियाचा राजा 1918-1453 पासून).
-चेकोस्लोवाकियाचे विलिगीकरण.
-लेबनॉनमधील दंगल (1968).
- निकाराग्वा मधील युद्ध (1979)
-सायप्रस विवाद (1974).
- इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्याची आणि त्यांची हत्या.
-सोव्हिएत युनियनचे विघटन.
-युगोस्लोवाकियाचे विलिगीकरण..
-पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र.
 -चेर्नोबलमधील अणु अपघात.
-स्टालिनच्या मृत्यूची तारीख.
- सिरिया मधील गृहयुद्ध.
-क्रिमियाचे पृथक्करण.

भविष्यात मंगळावर युद्ध होण्याचीही भविष्यवाणी

-2016 मध्ये युरोपला इस्लामिक अतिरेक्यांच्या हल्ल्याचा सामना करावा लागणार आहे. संघर्ष असा होईल की युरोपचे जीवन व मालमत्तेचे मोठे नुकसान होईल. विनाशाची ही मोहीम बरीच वर्षे चालेल आणि संपूर्ण खंड अगदी रिक्त होईल.
-चीन  2018 पर्यंत जगातील सर्वात मोठी महासत्ता होईल.
-2023- पृथ्वीची कक्षा बदलेल.
-2025- युरोपची लोकसंख्या शून्य होईल.
-2028- नवीन उर्जा स्त्रोताच्या शोधात मनुष्य शुक्रावर पोहचेल. अन्नाची कमतरता संपेल. मानवनिर्मित अंतराळ मिशन बुधच्या दिशेने जाईल.
-2033- पृथ्वीवरील बर्फाचा विशाल थर वितळेल.
-2043- इस्लामिक खिलाफत युरोपमध्ये पूर्णपणे स्थापित होईल. जगातील अर्थव्यवस्था मुस्लिम शासन असेल.
-2046 मध्ये माणूस प्रत्येक अवयव तयार करण्यास शिकेल. अवयव बदलणे हा उपचारांचा एक महत्त्वाचा भाग होईल.
-2066 - मशिदीवर हल्ला झाल्यानंतर अमेरिका अभूतपूर्व शस्त्रे वापरणार आहे. यामुळे तापमान अचानक कमी होईल. 
-2100- कृत्रिम सूर्य पृथ्वीवरील गडद भाग प्रकाशित करेल.
-2111- मानव आणि यंत्रमानव सापडतील. त्यांना सायबोर म्हणतात.
-2154- हळूहळू विकासामुळे प्राणी अर्धे मनुष्य होतील.
-2170- पृथ्वीवर अभूतपूर्व दुष्काळाचा सामना करावा लागेल.
-2195- एलियनच्या मदतीने मानव पाण्याखालील रहिवासी वस्ती तयार करेल. या वस्त्यांमध्ये जमिनीसारख्या सर्व सुविधा असतील.
-2196 - आशिया आणि युरोपमधील लोकांना भेटून मानवाची नवीन जात तयार केली जाईल.
-2201 - सूर्याच्या अणुक्रियेत बदल होईल. सूर्य कोमेजणे सुरू होईल आणि तापमान कमी होऊ लागेल.
-2288- वेळ प्रवास शक्य होईल. इतर ग्रहांशी संबंध तयार होतील.
-2480- दोन कृत्रिम सूर्य एकमेकांशी भिडतील. अंधाराने पृथ्वी व्यापली जाईल.
-3005- मंगळावर युद्ध होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com