Bakhmut : रशियाने ताब्यात घेतलेल्या बखमुट जगात या गोष्टीसाठी प्रसिद्ध

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन सैन्याने बखमुट शहर ताब्यात घेतल्याचा दावा फेटाळून लावला
Bakhmut
Bakhmutesakal

Bakhmut : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन सैन्याने बखमुट शहर ताब्यात घेतल्याचा दावा फेटाळून लावला आहे. जपानमधील पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की बखमट रशियन फेडरेशनच्या ताब्यात नाही. परिस्थिती जैसे थे आहे.

Bakhmut
Success Tips : प्रयत्न करूनही अपयशच पदरी पडतंय? या उपयांनी उघडेल यशाचे दार

मात्र, बखमुटमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं त्यांनी निश्चितपणे स्वीकारले आहे. यादरम्यान, त्यांनी असेही सांगितले की ते बखमुटमध्ये राहणाऱ्या लोकांचा जीव धोक्यात घालू शकत नाहीत.

Bakhmut
Travel News : हम्पीच्या विठ्ठल मंदिरातील स्तंभांमधून येतो गूढ आवाज

खरं तर, दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी जाहीर केले की रशियन सैन्याच्या सैनिकांनी बखमुट शहर ताब्यात घेतले आहे. याच्या काही तासांनंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही एक निवेदन जारी करून म्हटले - बखमुटला मुक्त करण्यात आले आहे. यासह व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या सैनिकांचे आणि वॅगनर ग्रुपचे अभिनंदन केले.

युक्रेनसाठी बखमुटचे महत्त्व काय आहे?

बखमुट हे युक्रेनच्या डोनेस्तक प्रांतातील एक शहर आहे. येथे रशियन आणि युक्रेनच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू आहे. यामध्ये दोन्ही बाजूंनी हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणि शहराचा बहुतांश भाग बेचिराख झाला आहे. असे असूनही हे शहर दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आहे.

Bakhmut
Jaggery Sharbat For Health : उष्माघातापासून बचाव करण्यासाठी गुळाच्या सरबतापेक्षा भारी काहीच नाही?

बखमुट हे पूर्व युक्रेनमधील एक लहान शहर आहे परंतु खाणकामाच्या दृष्टिकोनातून ते खूप महत्वाचे आहे. बखमुट शहर युक्रेनच्या अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या जवळ आहे जे रशियासाठी खूप महत्वाचे ठरू शकते. युक्रेनियन लोकांसाठी, बखमुट हे रशियन सैन्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्याच्या त्यांच्या संकल्पाचे प्रतीक म्हणून देखील पाहिले जाते.

Bakhmut
Electric Cars : भारतातील सर्वात स्वस्त टॉप ५ इलेक्ट्रिक कार

पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध

फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केले तोपर्यंत बखमुटची लोकसंख्या सुमारे 70,000 होती. आजपर्यंत या शहराने इतकी रक्तरंजित लढाई पाहिली नव्हती. संपूर्ण शहर स्मशानभूमी बनले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हे शहर भूमिगत गुहांसाठीही ओळखले जाते. हे वाइन उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. 19 व्या शतकाच्या शेवटी, भव्य इमारतींसह इथल्या हिरवाईनेमुळे ते जगात एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झाले.

Bakhmut
Cars Under 10 Lakh: कार घेण्याचा विचार करताय?पाहा स्वस्त अन् मस्त पर्याय

बखमुट हे पूर्वीपासून युद्धस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. पहिल्या महायुद्धात येथे रॉकेट डागण्यात आले होते. दोन्ही बाजूंच्या कमांडर्ससाठी हे एक मोठे रणांगण बनले आहे. सर्व विवादांना न जुमानता, युक्रेनियन सैन्य बखमुटच्या पूर्वेला बचावात्मकदृष्ट्या मजबूत उभे राहिले आहे. युक्रेनचे सैन्य रशियाला प्रत्युत्तर देणार असल्याच्या चर्चा आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com