एका भारतीयासह चार कैदी इंडोनेशियातील तुरुंगातून फरारी

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

बाली: इंडोनेशियाच्या बाली तुरुंगातून एका भारतीयासहित चार परदेशी कैद्यांनी सोमवारी पोबारा केला. यासंदर्भातील माहिती बालीच्या कुता उतरा ठाण्याचे अधिकारी पुतु इका प्रबावा यांनी दिली.

बाली: इंडोनेशियाच्या बाली तुरुंगातून एका भारतीयासहित चार परदेशी कैद्यांनी सोमवारी पोबारा केला. यासंदर्भातील माहिती बालीच्या कुता उतरा ठाण्याचे अधिकारी पुतु इका प्रबावा यांनी दिली.

बालीची राजधानी डेनपसेरच्या केरोबोकेन तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना आज सकाळी तुरुंगाची तपासणीदरम्यान चार कैदी फरारी झाल्याचे निदर्शनास आले. कैदी फरारी झाल्याचे समजताच सर्वत्र दक्षतेचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रबावा यांच्या मते, चारही कैदी भिंतीतील एका भुयारातून फरारी झाले असावेत. या भुयाराची रुंदी 15 मीटर असून हे भुयार मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या भुयाराला जाऊन मिळते. फरारी कैद्याची ओळख पटली असून, ऑस्ट्रेलियाचा शॉन एडवर्ड डेव्हिसन (वय 33), बल्गेरियाचा डिमितार निकोलोव्ह (वय 43), भारताचा मोहंमद सईद (वय 31) आणि मलेशियाचा टी कोको किंग बिन टी किम (वय 50) अशी त्यांची नावे आहेत. भारताचा कैदी सईद हा अमलीपदार्थाच्या तस्करीप्रकरणी 14 वर्षांची शिक्षा भोगत आहे. याच गुन्ह्यासाठी किंगला सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. फरारी कैद्याची छायाचित्रे बालीच्या सर्व तुरुंगांना पाठवण्यात आल्याची माहिती प्रबावा यांनी दिली.

इंडोनेशियात फरारी कैद्याची समस्या
इंडोनेशियात तुरुंगातून कैदी पळून जाण्याचा घटना सामान्य मानली जाते. कैद्यांची वाढती संख्या हा पोलिस प्रशासनासमोर गंभीर प्रश्‍न मानला जातो. बहुंताशी कैदी हे अमलीपदार्थ तस्करीशी निगडित आहेत. गेल्या आठवड्यात पावसामुळे तुरुंगाची भिंत ढासळल्याने 12 कैदी पळून गेले होते. गेल्या महिन्यात सुमारे चारशेहून अधिक कैदी पळून गेले आहेत.

Web Title: bali indonesia news Prisoner and jail