संयुक्त अरब अमिरातीच्या विमान प्रवासास कतारच्या प्रवाशांना बंदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जून 2017

दुबई/ सिडनी - संयुक्त अरब अमिरातीने कतारच्या कोणत्याही प्रवाशास देशातील विमानतळावर उतरविण्यास नकार दिला आहे. आखाती देशांनी चोहोबाजूंनी कतारची कोंडी चालविली असून, यामुळे कतारच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. ऑस्ट्रेलियातील विमानांमध्ये कतारच्या प्रवाशांना घेण्यास संयुक्त अरब अमिरातीच्या विमान कंपन्यांनी नकार दिला.

कतारवरील बंदीमुळे सौदी अरेबिया, संयुक्‍त अरब अमिराती, इजिप्त आणि बहारिन आदी देशांनी कतारवर बंदी घातली असून, कतारच्या नागरिकांना या आधीच देश सोडण्यास सांगितले आहे. आता कतारच्या नागरिकांना विमानसेवा देण्यासही या देशांच्या विमान कंपन्यांनी नकार दिला आहे. कतारचा व्हिसा असणाऱ्यांना संयुक्त अरब अमिरातीमधून प्रवास करता येणार नसल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

Web Title: ban on air travellers international news marathi news