कॅफेवरील हल्ल्याचा सूत्रधार ठार

पीटीआय
शनिवार, 7 जानेवारी 2017

दोन्ही दहशतवादी जमात उल मुजाहिदीन या संघटनेचे असून, नूरुल इस्लाम उर्फ मार्जान आणि सद्दाम हुसेन अशी त्यांची नावे आहेत.

 

ढाका - बांगलादेशची राजधानी ढाक्‍यामधील कॅफेमध्ये गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एकाला पोलिसांनी आज चकमकीत ठार मारले. त्याच्याबरोबर असलेल्या आणखी एका म्होरक्‍यावरही पोलिसांनी गोळ्या झाडल्या. एका हिंदू पुजाऱ्याच्या हत्येचा त्याच्यावर आरोप होता. हे दोन्ही दहशतवादी जमात उल मुजाहिदीन या संघटनेचे असून, नूरुल इस्लाम उर्फ मार्जान आणि सद्दाम हुसेन अशी त्यांची नावे आहेत.

1 जुलैला कॅफेमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये परदेशी नागरिकांसह 22 जणांचा मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका भारतीय मुलीचाही समावेश होता. या हल्ल्याचा कट मार्जानने रचला होता. सद्दाम याच्यावरही एक जपानी नागरिक आणि एक हिंदू पुजारी यांच्यासह दहा जणांचा खून केल्याचा आरोप आहे.
 

Web Title: Bangladesh cafe attack 'mastermind' killed in gunfight