वाढत्या रोहिंग्यांमुळे बांगलादेश चिंतेत

गुन्हेगारीचे प्रमाण वाढले; पाच वर्षांपासून आश्रयाला
Bangladesh concerned over rising Rohingya
Bangladesh concerned over rising RohingyaSakal

कॉक्स बझार - म्यानमारमधील सैन्याने केलेल्या अत्याचारांपासून पळ काढलेल्या लाखो रोहिंग्या मुस्लिमांना आश्रय देणाऱ्या बांगलादेशला आता या समाजाच्या वाढत्या लोकसंख्येची चिंता भेडसावत आहे. याशिवाय, अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये रोहिंग्यांचा समावेश वाढत असल्यानेही सरकार त्रस्त झाले असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. म्यानमारमध्ये २०१७ मध्ये सैन्याने अनन्वित अत्याचार केल्याने लाखो रोहिंग्या मुस्लिमांना देश सोडून पळून जावे लागले. त्यापैकी अनेकांनी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला आहे.

स्थानिकांशी संघर्ष

रोहिंग्या मुस्लिमांमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असतानाच त्यांचा स्थानिकांशी संघर्ष होण्याचे प्रमाणही वाढले आहे. रोहिंग्यांमुळेच महागाईत वाढ झाली असून रोजगारावरही परिणाम झाला असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. येथील रोजंदारीचे दर ५० टक्क्यांनी घसरले आहेत.

छावण्या बनले अड्डे

कॉक्स बझार भागात रोहिंग्या मुस्लिमांसाठी छावण्या उभारण्यात आल्या आहेत. रोहिंग्यांच्या छावण्या या कट्टरतावादी गटांचे अड्डे बनत असल्याचे चित्र आहे. सहा महिन्यांत रोहिंग्या मुस्लिमांमधील गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणावर अमलीपदार्थ व तस्करी केलेले सोने जप्त केले आहे. तसेच, जनतेत लोकसंख्या वाढीचा दर एक टक्का असताना रोहिंग्याची संख्या वर्षाला ५ टक्के या वेगाने वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com