बांगलादेशमध्ये दुर्गा पूजा मंडपात हिंसाचार; तिघांचा मृत्यू

या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Bangladesh Violence
Bangladesh ViolenceTeam eSakal

देशभरात सध्या नवरात्र मोहोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. तसंच सीमेपलिकडे बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदू समूदायाकडून देखील हा सण साजरा केला जातो. अशातच बांगलादेशच्या चांदपूरमध्ये दुर्गा पूजेच्या उत्सवादरम्यान हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे. चांदपूरच्या हाजीगंजमध्ये दुर्गा पूजेदरम्यान झालेल्या हिंसाचारात पत्रकार, पोलीस आणि सामान्य नागरिकांसह तीन जण ठार झाल्याची धक्कादाय घटना समोर आलीये. दक्षिण बांगलादेशमध्ये झालेल्या दुर्गापूजा मंडपातील हिंसक हल्ल्यांच्यामागे जमात-ए-इस्लामी हिंद या संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातो.

ढाका आणि नवी दिल्लीतील मुत्सद्द्यांच्या म्हणण्यानुसार, 13 ऑक्टोबर रोजी कमिलामध्ये मंडप आणि मंदिरांवर हल्ले झाले होते, मुस्लिमांच्या धार्मिक ग्रंथाची दुर्गा मूर्तीच्या पायाजवळ ठेवून कथितरित्या अपमान केल्यानंतर हा हिंसाचार झाल्याची माहिती मिळाली आहे. समाज माध्यमांद्वारे या घटनेचा सोशल मीडियावर पसरताच, नोआखली, चांदपूर, कॉक्स बाजार, चॅटोग्राम, चापैनवाबगंज, पबना, मौलवीबझारा आणि कुरीग्रामच्या आसपासच्या भागात मंडपांवर हिंसक हल्ले झाले.

Bangladesh Violence
तैवानमध्ये 13 मजली इमारत जळून खाक; आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू

प्रारंभी, पोलीस प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत होते, परंतु भारतीय उच्चायुक्तांनी प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर सशस्त्र पोलीस आणि स्थानिक यंत्रणांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. चांदपूरमध्ये दोन आंदोलकांसह तीन जण ठार झाले आणि कमिलामध्ये रबरी गोळ्यांनी अनेकजण जखमी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com