बापूंचा चरखा ठरला जगात प्रभावशाली 

पीटीआय
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

न्यूयॉर्क - महात्मा गांधी चरख्यावर सूतकताई करत असलेल्या १९४६ मधील छायाचित्राचा समावेश कायम प्रभावशाली ठरणाऱ्या जगातील १०० छायाचित्रांत झाला आहे. ‘टाइम’ मासिकाने ‘जगात बदल घडविणारी चित्रे’ या नावाखाली छायाचित्रांचा संग्रह केला आहे. त्यात गांधीजींच्या या छायाचित्राचा समावेश आहे.

चष्मा घातलेले गांधीजी जमिनीवर एका सतरंजीवर बसून सूतकताई करत आहेत. त्याचबरोबर वाचनासाठी त्यांची मान खाली झुकल्याचे या कृष्णधवल छायाचित्रात दिसत आहे. भारतीय नेत्यांवरील एका लेखासाठी मार्गारेट बोर्क - व्हाईट यांनी हे छायाचित्र काढले होते; मात्र त्यानंतर दोन वर्षांच्या अवधीतच गांधीजींची हत्या झाली. त्या वेळी त्यांना श्रद्धांजलीपर लेखात या छायाचित्राचा वापर करण्यात आला होता. ‘शांतीदूत’ म्हणून गांधीजींचे नाव जगात अजरामर करण्यात या छायाचित्राचा हातभार लागला व या चित्राची नोंदही कायमस्वरूपी कोरली गेली, असे टाइम्सने म्हटले आहे.

टाइमच्या संग्रहात १८२० ते २०१५ या कालावधीतील १०० ऐतिहासिक छायाचित्रे आहेत. त्या त्या काळातील प्रसंगातून मानवी मनाचे दर्शन त्यातून होते. बोड्रमच्या समुद्रकिनारी एकाकी अवस्थेतील तीन वर्षांच्या ॲलन कुर्दी या सीरियन मुलाच्या मृतदेहाचे छायाचित्रही यात असून, सीरियातील स्थलांतरितांची शोकांतिका यातून दिसते. त्याचप्रमाणे अल कायदाचा म्होरक्‍या ओसामा बिन लादेन याला मारण्यासाठी अमेरिकेने २०११ मध्ये गुप्त मोहीम आखली होती. त्याचे निरीक्षण करताना अध्यक्ष बराक ओमाबा व त्यांच्या सहकाऱ्यांचे छायाचित्र, ट्विन टॉवरमधून स्वतःच्या सुटकेच्या प्रयत्नात असलेला एक जण खाली पडतोय असे २००१ मधील छायाचित्र या संग्रहात आहे. 

Web Title: Bapu spinning wheel became influential in the world