सर्व काही ठीक होईल : बराक ओबामा

पीटीआय
गुरुवार, 19 जानेवारी 2017

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली सर्व काही ठीक होईल, अशी आशा व्यक्त करत मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज आपल्या देशवासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, अमेरिकेच्या मूल्यांना धक्का पोचल्यास आवाज उठवू, असा इशाराही त्यांनी या वेळी नव्या प्रशासनाला दिला. 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली सर्व काही ठीक होईल, अशी आशा व्यक्त करत मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज आपल्या देशवासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, अमेरिकेच्या मूल्यांना धक्का पोचल्यास आवाज उठवू, असा इशाराही त्यांनी या वेळी नव्या प्रशासनाला दिला. 

बराक ओबामा यांनी आज व्हाइट हाउसमध्ये अध्यक्ष म्हणून अखेरची पत्रकार परिषद घेतली. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या धोरणांना अनेक जणांचा विरोध आहे. हा संदर्भ घेत ओबामा म्हणाले,''सर्व काही ठीक होईल, असे मला वाटते. मात्र यासाठी आपल्याला लढावे लागेल आणि थोडे काम करावे लागेल. आयतेच काहीही मिळणार नाही. मी ट्रम्प यांना योग्य तो सल्ला दिला असून, विविध मुद्यांवर चर्चाही केली आहे. आमच्या सरकारने देशासाठी आवश्‍यक म्हणून सुरू केलेल्या विविध योजनांना आणि धोरणांना त्यांचा विरोध आहे. मात्र, ट्रम्प यांना योग्य वाटेल त्याच मार्गांने त्यांनी जावे. प्रत्यक्ष काम करताना धोरणांमध्ये फारसा बदल होणार नाही. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेच्या मूल्यांना धक्का लावला तर मात्र मी आवाज उठवेन.'' या पुढील काळात कुटुंबाकडे अधिक लक्ष देण्याचा विचार असल्याचे सांगत ओबामा यांनी काही लिखाण करण्याची इच्छाही व्यक्त केली. 

संबंध अधिक दृढ होतील 
दक्षिण आशियातील राजकारणात भारताचे महत्त्व मोठे असून, जागतिक विकासात त्यांच्याबरोबरील भागीदारी अत्यंत उपयुक्त आहे, असे अमेरिकेचे नियोजित उपाध्यक्ष माइक पेन्स यांचे निकटचे सहकारी राजू चिंताला यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील नव्या प्रशासनामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्‍वासही या वेळी त्यांनी व्यक्त केला. चिंताला हे प्रसिद्ध राजकीय सल्लागार आहेत. जगासमोरील अनेक समस्यांबाबत भारत आणि अमेरिकेचा दृष्टिकोन सारखाच असल्याने दोन्ही देशांमधील भागीदारी वाढल्यास जगाला फायदा होईल, असे चिंताला म्हणाले. 

नरेंद्र मोदींना धन्यवाद 
अध्यक्षपदाची अखेर जवळ आली असताना बराक ओबामा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करत अमेरिकेबरोबरील संबंध दृढ करण्यास प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच संरक्षण आणि सुरक्षाविषयक विविध मुद्यांवर चर्चा केली. 2015 मधील प्रजासत्ताक दिनावेळी केलेल्या भारत दौऱ्याची आठवण सांगत ओबामा यांनी आगामी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही मोदींना दिल्या. मोदी यांनीही अमेरिकेने वारंवार दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल ओबामा यांचे आभार मानले आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Barack Obama thanks Narendra Modi for stronger ties