चक्क विमानात अवतरला भिकारी !

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

कतार एअरलाईन्सचे विमान कराचीहून बँकाँगला जात होते. या विमानात भिकारी शिरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेकांना धक्काच बसला. विमानातील भिकारी हा पाकिस्तानचा नागरिक असल्याची माहिती मिळत आहे.

इस्लामाबाद : आत्तापर्यंत आपण रेल्वेने प्रवास करताना अनेकदा भिकारी येत असल्याचे पाहिले असेलच. मात्र, आता विमानातही भिकारी आल्याचा प्रकार समोर आला आहे. कराचीहून बँकॉकला जाणाऱ्या विमानात भिकारी शिरला. या भिकाऱ्याने विमानात भीकही मागितली. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

कतार एअरलाईन्सचे विमान कराचीहून बँकाँगला जात होते. या विमानात भिकारी शिरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेकांना धक्काच बसला. विमानातील भिकारी हा पाकिस्तानचा नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबात पाकिस्तानच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्टीकरण देत हा दावा फेटाळून लावला. पाकिस्तानच्या स्थानिक वृत्तवाहिनीने विमानात शिरलेली ही व्यक्ती इराणची असल्याचे सांगितले. 

या घटनेच्या व्हिडिओमध्ये भिकारी विमानातील आसनांमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत उभा असून, विमानातील कर्मचारी या भिकाऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याचा कोणताही परिणाम भिकाऱ्यावर होताना दिसत नाही.

दरम्यान, विमानात शिरलेल्या या भिकाऱ्याचे नाव अद्याप समजू शकले नसून, हा भिकारी विमानतळावर कसा पोचला. त्यानंतर तो विमानात पोचला कसा याचा तपास सुरु करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A beggar begging on a Karachi Bangkok Flight Video Goes Viral