'एससीओ' परिषदेत शरीफ-झिनपिंग अनेकदा भेटले

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

चीनचे स्पष्टीकरण; भेट नाकारल्याचा अहवाल मूर्खपणाचा

बीजिंग: शांघाय सहकार्य संघटनांच्या (एससीओ) परिषदेत चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे अनेकदा एकमेकांना भेटले. त्या वेळी दोघा नेत्यांमध्ये बलुचिस्तान येथे दोन चिनी नागरिकांच्या हत्येविषयी चर्चाही झाली, असे चीनकडून स्पष्ट करण्यात आले. झिनपिंग यांनी शरीफ यांची भेट नाकारत त्यांना डावलले असल्याच्या अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला होता. हा अहवालातील दावा फेटाळत लावत हा अहवालच मूर्खपणाचा असल्याचे चीनने म्हटले आहे.

याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लु कॅंग म्हणाले की, "एससीओ'मध्ये विविध देशांच्या नेत्यांच्या परिषदेदरम्यान झिनपिंग हे शरीफ यांना अनेकदा भेटले होते; पण या दोन नेत्यांच्या भेटीबाबतचे सध्याचे जे काही अहवाल प्रसिद्ध होत आहे ते अनावश्‍यक आणि मूर्खपणाचे आहेत. चीन व पाकिस्तान धोरणात्मक भागीदारीचा आनंद घेत घेत असल्याचे कॅंग म्हणाले. या वेळी झिनपिंग आणि शरीफ यांच्यात द्विपक्षीय बैठका झाली का, याबाबत मात्र कॅंग यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.
पाकिस्तानच्या एका वृत्तसंस्थेने "एससीओ' परिषदेदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना डावलले असल्याचा दावा एका अहवालाद्वारे केला होता. "एससीओ' परिषदेत कझाकस्तान, उझबेकीस्तान, अफगाणिस्तान आणि रशिया आदी देशांच्या अध्यक्षांना चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग भेटले मात्र ते पाकिस्तानच्या पंतप्रधांनांना भेटले नाहीत, असे या अहवालात नमूद करण्यात आले होते. 10 जून रोजी पाकिस्तानी माध्यमांनी हा अहवाल प्रसिद्ध केला होता. याचसोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि कझाकस्तानचे अध्यक्ष नूर सुलतान नझरबेयेव्ह यांच्याशी झिनपिंग यांच्या झालेल्या भेटीला चिनी माध्यमांनी अधिक महत्त्व दिले गेल्याचे पाकिस्तानी वृत्तसंस्थांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मोदी-झिनपिंग छायाचित्राने पित्त खवळले
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावरही शरीफ वगळता सर्व "एससीओ' सदस्य देशांच्या नेत्यांशी चर्चा करताना झिनपिंग यांची छायाचित्रे टाकण्यात आली आहेत. यामध्ये मोदी-झिनपिंग यांच्यादरम्यान चर्चेचे छायाचित्रही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानी माध्यमांचे पित्त खवळले, असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: beijing news china jinping and pakistan nawaz sharif