पाकच्या मदतीला धावला चीन

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

अमेरिकेने खडसावल्यानंतर "ड्रॅगन'कडून जोरदार पाठराखण

बीजिंग: दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावल्यानंतर आपल्या मित्रराष्ट्राचा बचाव करण्यासाठी चीन पुढे सरसावला आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढ्यात पाकिस्तान आघाडीवर असल्याचे सांगत चीनकडून पाठराखण करण्यात आली आहे.

अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियाबाबतच्या धोरणांची घोषणा करण्यासाठी अमेरिकेतील नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली. पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याचे स्पष्ट करत ट्रम्प म्हणाले, की पाकिस्तान ज्यांना मदत करतो आहे ते दहशतवादी अमेरिकी नागरिकांना अफगाणिस्तानात ठार करत आहेत. दहशतवादाला थारा दिल्यास पाकिस्तानला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.

ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या मदतीला चीन धावला आहे. ""दक्षिण आशियाई विभागात शांतता, स्थैर्य निर्माण होण्यासाठी अमेरिकेच्या नव्या धोरणांची मदत होईल, अशी आम्हाला आशा आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढाईमध्ये पाकिस्तान आघाडीवर असून, त्यासाठी पाकिस्तानने मोठा त्याग केला आहे. विभागातील स्थैर्य आणि शांततेसाठी पाकिस्तानचे योगदान मोठे आहे,'' अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयच्या प्रवक्‍त्या हुआ चुनयींग यांनी व्यक्त केली.
दहशतवादाच्या विरोधातील पाकिस्तानच्या प्रयत्नांची दखल आंतरराष्ट्रीय समुदायाने घेतली घ्यायला हवी, असे ही चीनकडून स्पष्ट करण्यात आले. एकूणच अमेरिकेच्या टीकेनंतर चीन पाकिस्तानच्या मदतीला धावला आहे.

Web Title: beijing news usa terrorist pakistan help china