भयंकर! स्फोटानंतर उद्ध्वस्त झालेल्या बैरुतचे सॅटेलाइट PHOTO व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

बैरुतमध्ये स्फोटामुळे अनेक सुंदर इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. आधीचे फोटो पाहिले तर विश्वासही बसणार नाही अशी परिस्थिती दिसते. 

बैरुत - लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये मंगळवारी झालेला स्फोट हा एका लहानशा अणु बॉम्बच्या हल्ल्यासारखाच होता. यामुळे शहरातील अर्धा भाग बेचिराख झाल्याची परिस्थिती आहे. या स्फोटांन दहा किलोमीटर परिसरात मोठी हानी झाली आहे. रस्त्यावर मृतदेहांची अवस्था खूपच वाईट झाली होती. अनेक सुंदर इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. आधीचे फोटो पाहिले तर विश्वासही बसणार नाही अशी परिस्थिती दिसते. 

बैरुत पोर्टजवळ असलेल्या इमारती, घरे आणि शॉपिंग मॉल्स उद्ध्वस्त झाले आहेत. या परिसरात जखमी झालेल्यांवर उपचार करणंही कठीण आहे. रस्त्यांवर खांब कोसळले आहेत. जवळची रुग्णालयांनाही स्फोटाचा हादरा बसला आहे. स्फोट अमोनियम नायट्रेटमुळे झाला असला तरी हा अपघात होता की घातपात याची माहिती समजू शकलेली नाही. 

Image

स्फोटांमध्ये जखमी झालेल्यांसाठी रुग्णालये कमी पडत आहेत. स्फोटामुळे बैरुतच्या चारी बाजुला भूकंपासारखा धक्का बसला. याची तीव्रता जवळपास 4.5 रिश्टर स्केल भूकंपा इतकी होती.

स्फोट जिथं झाला त्याठिकाणी 2750 टनांहून अधिक अमोनियम नायट्रेटचा साठा होता. त्याचा स्फोट झाल्यानं विदारक अवस्था झाली आहे. हा स्फोट एका लहानशा अणु स्फोटासारखाच होता. 

Image

स्फोटानंतर आकाशात मशरूमच्या आकाराचे ढग तयार झाले. आधी पांढऱ्या रंगाचे असणारे ढग अचानक स्फोट झाल्यानंतर नारंगी रंगाचे झाले. यानंतरच स्फोटाचा दणका अर्ध्या शहराला बसला. समुद्रातही लाटा उसळल्या आणि शहरातील इमारतींच्या काचाही फुटल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beirut blast city labnon satellite photo viral