इसिसने केली 116 जणांची हत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

बैरुत : इस्लामिक स्टेटने सीरियन सरकारबरोबर आघाडी करीत या महिन्यात अल कतारियन येथे 116 जणांची हत्या केली, असे मानवाधिकार आयोगाच्या सदस्याने सांगितले.

बैरुत : इस्लामिक स्टेटने सीरियन सरकारबरोबर आघाडी करीत या महिन्यात अल कतारियन येथे 116 जणांची हत्या केली, असे मानवाधिकार आयोगाच्या सदस्याने सांगितले.

ब्रिटनमधील मानवाधिकार हक्क आयोगाचे निरीक्षक रामी अब्देल रहमान म्हणाले, ""इसिसने सिरियन सैन्याच्या मदतीने 20 दिवसांत किमान 116 जणांची हत्या केली आहे. सरकारी फौजांनी मध्य भागातील होमस प्रांतातील अल कतारियनवर ताबा मिळविला यापूर्वी तीन आठवड्यांपूर्वी त्याच्या जिहादींचा ताबा होता. 2015 मध्ये इसिसने हे शहर प्रथम आपल्या ताब्यात घेतले होते. मात्र गेल्या वर्षी रशियन सैन्याबरोबरच्या लढाईत त्यांना या शहरावरील आपला ताबा सोडावा लागला होता. मात्र सरकारी फौजांनी शनिवारी त्याच्यावर पुन्हा ताबा मिळविल्यानंतर शहरातील रहिवाशांना तेथे मृतदेह आढळून आले. त्यांची गोळ्या घालून आणि चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.''

Web Title: beirut news isis killed 116 people