Video : भारत पोहचला चंद्रावर अन् पाकचे लक्ष बेंबीवर....

वृत्तसंस्था
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

भारत चंद्रयान 2 लाँच करत आहे. अर्थव्यवस्था यापेक्षाही खाली घसरली, तर निर्वस्त्र डान्स आयोजित करणार का?

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बेली डान्सचे आयोजन केले होते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्सनी टीका केली आहे. पाकिस्तानमधील नागिरकांना खायला अन्न मिळत नाही अन् तुम्ही बेली डान्स घेताय, असे नेटिझन्स विचारच आहेत.

पाकिस्तानच्या सरहद चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे 4 ते 8 सप्टेंबरपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बेली डान्सचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या बेली डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेले व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. नेटिझन्स पाकिस्तान सरकारवर जोरदार करत आहेत. दुसरीकडे काही जण याचे समर्थनही करत आहेत.

पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी 'नवीन पाकिस्तान' असे म्हटले आहे. नेटिझन्स म्हणतात, 'पाकिस्तान आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी बेली डान्सची मदत घेत आहे, यानंतर काय होणार?, अर्थव्यवस्था यापेक्षाही खाली घसरली, तर निर्वस्त्र डान्स आयोजित करणार का? एकिकडे भारत चंद्रयान 2 लाँच करत आहे. पाकिस्तान गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बेली डान्स आयोजित करत आहे. नागरिकांना खायला मिळत नाही अन् हे बेली डान्स घेत आहेत. काय तर नवीन पाकिस्तान.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: belly dance organized by pakistan to strengthen economy