पगारवाढीसाठी विमानतळावर संप; जर्मनीत 650 उड्डाणे रद्द

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

यापूर्वी मागील आठवड्यात शुक्रवारी अशाच प्रकारे संप केल्याने सुमारे 700 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. 

बर्लिन : जर्मनीची राजधानी आणि देशातील सर्वांत मोठे शहर असलेल्या बर्लिनमधील दोन विमानतळांवरील कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने 650 पेक्षा जास्त विमान उड्डाणे रद्द होण्याची शक्यता असल्याने येथील हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

पगारवाढीच्या मुद्द्यावरून विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी मागील काही आठवड्यांमध्ये अनेकवेळा काम बंद आंदोलने केली आहेत. तेगेल आणि शोनफेल्ड या विमानतळांवर सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून कर्मचाऱ्यांनी सलग 25 तासांचा संप सुरू केला. 

यापूर्वी मागील आठवड्यात शुक्रवारी अशाच प्रकारे संप केल्याने सुमारे 700 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. 
प्रवासी व त्यांच्या सामानाची देखरेख पाहणाऱ्या सुमारे 2000 कर्मचाऱ्यांचे पगार वाढविण्याची मागणी वेर्दी ही सेवा कामगारांची संघटना करीत आहे. तेगेल विमानतळावरून होणारी 448, तर शोनफेल्ड विमानतळावरून होणारी 194 विमान उड्डाणे रद्द केली जातील असे प्रशासनाने सांगितले. 
 

Web Title: Berlin airports strike forces cancellation of over 650 flights