बर्लिनमध्ये ट्रकखाली चिरडून 12 जण ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

जर्मनीतील वाचकांना आवाहन

आपण ई सकाळचे वाचक आहात आणि सध्या जर्मनीमध्ये असाल, तर आमच्याशी संपर्क करा. आपला संपर्काचा तपशील webeditor@esakal.com  वर आवर्जून पाठवा. आम्ही आपल्याशी संपर्क करू आणि आपला अनुभव ई सकाळ आणि सकाळ समुहाच्या माध्यमांमार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱयापर्यंत पोहचवू.

बर्लिन - जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये सोमवारी रात्री ख्रिसमस पार्टीत ट्रक घूसवून हल्लेखोराने 12 जणांना ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत 48 जण जखमी झाले आहेत.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बर्लिनमधील कायझर विलहेम मेमोरियल चर्चजवळ नाताळनिमित्त पार्टी सुरु असताना एका व्यक्तीने ट्रक घुसविला. या ट्रकखाली चिरडून 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. खरेदीसाठी झालेली गर्दी पाहून या व्यक्तीने हे कृत्य केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जर्मनीचे अंतर्गत गृहमंत्री थॉमस डी मेईझेरी यांनी सांगितले, की या हल्ल्याबाबत अनेक शक्यता आहेत. या ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून, चौकशी करण्यात येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जर्मनीतील वाचकांना आवाहन

आपण ई सकाळचे वाचक आहात आणि सध्या जर्मनीमध्ये असाल, तर आमच्याशी संपर्क करा. आपला संपर्काचा तपशील webeditor@esakal.com  वर आवर्जून पाठवा. आम्ही आपल्याशी संपर्क करू आणि आपला अनुभव ई सकाळ आणि सकाळ समुहाच्या माध्यमांमार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱयापर्यंत पोहचवू.

Web Title: Berlin Breitscheidplatz: Lorry kills 12 at Christmas market

टॅग्स