बर्लिनमध्ये 'फिटे अंधाराचे जाळे' प्रस्तुत

मानसी बरवे
रविवार, 23 सप्टेंबर 2018

कार्यक्रमाची सांगता पांडुरंगाच्या गजराने आणि श्रीगणेशाच्या महाआरतीने झाली. या कार्यक्रमात तबल्यावर तुषार आग्रे यांनी बहारदार साथ केली. समर्थ गायन साथ संपदा सप्रे यांनी केली.

बर्लिन टॉकीजच्या विद्यमाने पहिल्यांदाच बर्लिनमध्ये 'फिटे अंधाराचे जाळे' या श्रीधर फडके प्रस्तुत, लोकप्रिय कार्यक्रमाचे 16 सप्टेंबरला सादरीकरण झाले. गणेशोत्सव आणि बाबूजींचं जन्म शताब्दी वर्ष हा सुयोग पण जुळून आला. त्यानिमित्ताने सुधीर फडके (बाबूजी) यांच्या जीवनावर आधारीत, ध्वनीचित्रफीत सादर करण्यात आली.

कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. भारतीय राजदूतावासातील वरिष्ठ अधिकारी श्री. रवीचंद्रन आणि श्री. व सौ. कौल यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. श्री. रवीचंद्रन यांनी बर्लिन
टॉकीजचे उत्साही संचालक रोहित प्रभू, सानिका बरवे, अमोल सैनिस आणि दीपक पाटील व त्यांचे सहकारी यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला बर्लिन आणि आसपासच्या परिसरातील रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यांच्या उस्फुर्त प्रतिसादाने व टाळ्यांच्या गजराने कार्यक्रमाची रंगत वाढतच गेली.

berlin

कार्यक्रमाची सांगता पांडुरंगाच्या गजराने आणि श्रीगणेशाच्या महाआरतीने झाली. या कार्यक्रमात तबल्यावर तुषार आग्रे यांनी बहारदार साथ केली. समर्थ गायन साथ संपदा सप्रे यांनी केली. सहगायक - स्थानिक कलाकार मोहित कार्ले, मोहिनी काळे आणि श्री होमकर, सूत्रसंचालन राजेश भिडे आणि सानिका बरवे यांनी केले. ध्वनीवर्धनाचे चोख व्यवस्थापन राईनाल्ड श्वेन्क यांनी केले.

प्रेक्षकांनी पुढील कार्यक्रमाची आतुरतेने वाट पहात असल्याची भावना व्यक्त केली. श्रीधरजी यांनी प्रेक्षकांचे उस्फुर्त प्रतिसादाबद्दल भरभरून कौतुक केले व आभार मानले आणि लवकरच परत कार्यक्रम करण्याचा मानस व्यक्त केला.

श्री. श्रीधर यांचे जर्मनीमध्ये बर्लिन शिवाय म्युनिक, आखन आणि फ्रँकफ्रुट येथेही कार्यक्रम होत आहेत. श्रीगणेश मंदीर या संस्थेतर्फे भव्य गणेश मंदिराचे बांधकाम सुरू आहे. या कार्यक्रमाने त्यासाठीच्या निधी संकलनात हातभार लावला. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात अनेक स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आणि कुशल योगदान होते.

बर्लिनमध्ये 600 च्या आसपास मराठी लोकांचे वास्तव्य असून त्यांचापण गणेशोत्सवात सहभाग असतो. सुदैवाने या काळात मी माझ्या मुलाकडे वास्तव्यास असल्याने या कार्यक्रमाचा मला आस्वाद घेता आला.

Berlin

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Berlin Feete Andharache Jaale program presented